काकडीचे थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

माया भावने यांची मी रेसिपी बनवत आहे. ही रेसिपी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवत आहे लोक डॉन मुळे जे सामान उपलब्ध होते त्यातच मी रेसिपी बनवत आहे .रेसिपी बनवलेली खूप छान झाली #cook snap #mayabhawane

काकडीचे थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)

माया भावने यांची मी रेसिपी बनवत आहे. ही रेसिपी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवत आहे लोक डॉन मुळे जे सामान उपलब्ध होते त्यातच मी रेसिपी बनवत आहे .रेसिपी बनवलेली खूप छान झाली #cook snap #mayabhawane

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
  1. 1/2 किलोकाकडी
  2. 1 वाटीतांदळाचे पीठ
  3. 1 वाटीबेसन
  4. 1 वाटीज्वारीचे पीठ
  5. 1 वाटीकणिक
  6. 1 वाटीदही
  7. 1 वाटीबारीक चिरलेला कांदा
  8. 1 वाटीबारीक चिरलेला टोमॅटो
  9. 1 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 1/2 चमचाआले-लसूण पेस्ट
  11. 1/2 चमचाओवा
  12. 1 चमचातीळ
  13. 1 चमचातिखट किंवा आवडीनुसार
  14. 1/2 चमचाहळद
  15. 1/2 चमचाधने पावडर
  16. 1 टेबलस्पूनजीर हिरवी मिरची कढीपत्ता यांची बारीक पेस्ट
  17. प्रमाणानुसार मीठ
  18. 1/2 वाटीतेल
  19. 1/2 चमचाहिंग

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    प्रथम काकडीची स्वच्छ धुऊन किसून घ्यावे. त्यानंतर एक वाटी कांदा एक वाटी टोमॅटो एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे आणि हिरव्या मिरच्या जीर आणि कढीपत्ता यांची बारीक पेस्ट करून घ्यावी तसेच आलं साजन पेस्ट करून घ्यावी. एका पराती मध्ये

  2. 2

    एका पराती मधे काकडीचा कीस टोमॅटो कांदा कोथिंबीर हिरव्या मिरचीची पेस्ट आलं-लसणाची पेस्ट घ्यावी आणि त्यामध्ये एक वाटी तांदुळाचे पीठ एक वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी बेसन एक वाटी कणिक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर एक चमचा तिखट प्रमाणानुसार मीठ हिंग ओवा तीळ एक वाटी दही घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. पाच मिनिटे तसेच मिक्स करून झाकून ठेवून द्यावे.

  3. 3

    गॅसवर तवा ठेवावा त्या तव्याला ब्रशच्या साह्याने तेल लावून घ्यावे तेल लावल्यानंतर चमच्याच्या साह्याने थालिपीठ करून घ्यावे थालीपीठ झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून वाफ काढावी.

  4. 4

    वाफ काढल्यानंतर सराटया ने थालीपीठ परतून घ्यावे दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजवून घ्यावे. तयार आहे आपले गरमागरम थालीपीठ. हेच थालीपीठ खातांना दाताखाली कांदा टोमॅटो आला की खूप छान वाटते येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes