लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#nrr
जागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचा
नवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.
नववा घटक - दुध व लाल भोपळा
लाल भोपळ्याची खीर हा देवीचा आवडता नैवेद्य आहे.उपवासासाठी ही रेसिपी चालते.
ही माझी 401 वी रेसिपी आहे.

लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)

#nrr
जागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचा
नवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.
नववा घटक - दुध व लाल भोपळा
लाल भोपळ्याची खीर हा देवीचा आवडता नैवेद्य आहे.उपवासासाठी ही रेसिपी चालते.
ही माझी 401 वी रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 1.1/2 कप दूध
  2. 1/4 कपलाल भोपळ्याचा किस
  3. 3-4 टेबलस्पूनसाखर घालून
  4. 1 टेबलस्पूनदूध मसाला किंवा सुकामेव्याचे काप
  5. 8-10दाणे चारोळी
  6. 1 टीस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    एका पातेल्यात दूध व थोडीशी साखर घालून आटत ठेवावे. गॅस मंद आचेवर ठेवून चमच्याने हलवत राहावे म्हणजे खाली लागणार नाही. 1.1/2 कपाचा 1/2 कपाला थोडे जास्त आटवून घेणे.

  2. 2

    गॅसवर कढई गरम करत ठेवावी. तापल्यावर गॅस मंद आचेवर ठेवून तूप घालावे. तुपात चारोळ्या परतवून घेणे. त्यातच भोपळ्याचा किस घालून 5 मिनिटे परतवून घेणे. झाकण ठेवून शिजू द्यावे. नंतर साखर घालून विरघळेपर्यंत परतवून घेणे.

  3. 3

    भोपळा शिजला की गॅस बंद करावा. आटवलेल्या दूधात मसाला व भोपळ्याचा किस घालून मिक्स करून घेणे.

  4. 4

    ते पातेले गॅसवर ठेवून 2-3 उकळी आली की गॅस बंद करावा. भोपळ्याचा छान रंग दुधात उतरतो.ही खीर गरम किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes