कारल्याची रूचकर भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

ही रेसिपी मी माझ्या विहिणबाईंकडून शिकले आहे.त्या उत्तम करतात.अजिबात कडू लागत नसल्याने माझा नातुही ती आवडीने खातो.आता मी नेहमी ह्याच पद्धतीने करते.घरात सर्वांना आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 250 ग्रामताजी कोवळी कारली
  2. 2कांदे बारीक चिरून
  3. 1 टेबलस्पूनदाण्याचा जाडसर कुट
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनहळद गरजेनुसार
  6. 1 टेबलस्पूनतिखट चवीनुसार
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/2 टीस्पूनधणे पावडर
  9. गुळ चवीनुसार

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    कारली स्वच्छ धुवून बारीक फोडी करा.

  2. 2

    कढई गॅसवर ठेवून 5 मिनिटे कारली कोरडीच भाजून घ्या.त्याने कडूपणा कमी होईल.

  3. 3

    आता कढईत तेल गरम करून त्यात कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.हळद, तिखट, मीठ, धणे पावडर घालून कारल्याच्या फोडी घालून 5-7 मिनिटे म उसर होईपर्यंत शिजवा.

  4. 4

    दाण्याचा कूट आणि चवीनुसार गूळ घालून गॅस‌ बंद करावा.ही भाजी खुप रुचकर लागते.शिवाय कडूपणा अजिबात नाही.अवश्य करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes