काळ्या वाटण्याची रस्सा भाजी (Kalya Vatnyachi Rassa Bhaji)

Harshada Shirsekar
Harshada Shirsekar @HarshaDa_91

माझ्या ताईला काळ्या वाटण्याची रस्सा भाजी फार आवडते. त्यामुळे आई खास तिच्यासाठी हा पदार्थ तयार करतेच.

काळ्या वाटण्याची रस्सा भाजी (Kalya Vatnyachi Rassa Bhaji)

माझ्या ताईला काळ्या वाटण्याची रस्सा भाजी फार आवडते. त्यामुळे आई खास तिच्यासाठी हा पदार्थ तयार करतेच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीकाळे वाटणे (भिजवलेले)
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 चमचाएव्हरेस्ट गरम मसाला
  5. 1 चमचाएव्हरेस्ट चिकन मसाला
  6. 1 चमचालाल तिखट
  7. चिमूटभरहळद
  8. चवीनुसारमीठ
  9. 3 चमचेवाटण
  10. 1 चमचाआले-लसूण पेस्ट
  11. फोडणीसाठी कढीपत्ता
  12. सजावटीसाठी कोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    काळे वाटणे आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी कूकरमध्ये पाण्यात वाटाणे शिजवून घ्यावेत. तीन शिट्या होऊ द्याव्यात.

  2. 2

    त्यानंतर टोमॅटो, कांदा चिरून घ्यावा.

  3. 3

    गॅसवर एक भांडे ठेवून त्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी घालावी. यानंतर कांदा टोमॅटो परतून घ्यावा. थोड्या वेळाने वाटण घालावे.

  4. 4

    मग सर्व मसाले एकत्रित करून मिश्रण व्यवस्थित ढवळावे व शिजवलेले वाटाणे पाण्यासहीत भांड्यात ओतावेत. रस्सा भाजी नीट शिजावी याकरीता भांड्यावर थोडा वेळा झाकण ठेवावे. आपल्या आवडीनुसार रस्सा भाजी पातळ किंवा जाडसर करावी. तर मैत्रिणींनो तयार आपली गरमागरम काळ्या वाटण्याची खमंग रस्सा भाजी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Harshada Shirsekar
Harshada Shirsekar @HarshaDa_91
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes