बडीशेप चे सरबत (Fennel Seeds Drink Recipe In Marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

मार्च ते मे महिना उन्हाळ्याचा खूपच गर्मीचा सिझन. या महिन्यांत घराघरांमध्ये सरबते,आईस्क्रीम, मिल्कशेक केले जातात किंवा बाहेरून कोल्ड्रिंक तरी आणली जातात. आजची रेसिपी ही अशाच उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये करण्यासाठी अगदी योग्य रेसिपी आहे. आपल्या बहुतेक प्रत्येक घरात आढळणारी अत्यंत गुणकारी अशी बडीशेप वापरून हे सरबत मी तयार केले आहे. माझ्या लहानपणी आजूबाजूच्या गुजराती घरांमध्ये हे सरबत मी खूप प्यायले आहे. पाण्यात आणि दुधात त्याची चव अप्रतिम लागते. कमी साहित्यामध्ये पटकन होणारे हे सरबत. बडीशेपचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत.आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी, शरीराला थंडावा देण्यासाठी एक उत्तम एंटीऑक्सीडेंट आणि अनेक विटामिन्स असलेली ही बडीशेप आपण मुखवासामध्ये वापरतो. याच बहुगुणी बडीशेप पासून हे सरबत मी बनवले आहे आणि ते अजून आरोग्यदायी करण्यासाठी त्यात खडीसाखरेचा वापर केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4-5 मिनिटे
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रॅमबडीशेप
  2. दोन-तीन हिरव्या वेलच्या
  3. 200 ग्रॅमखडीसाखर किंवा साधी साखर
  4. खाण्याचा हिरवा रंग (ऑप्शनल)
  5. बर्फाचे क्यूब
  6. 1 कपथंड दूध आणि एक कप थंड पाणी
  7. 2 ते तीन टेबलस्पून भिजवलेला सब्जा
  8. 1 चिमूटभरलिंबू फुल किंवा सायट्रिक ऍसिड

कुकिंग सूचना

4-5 मिनिटे
  1. 1

    बडीशेप निवडून एका बाऊल मध्ये तिच्या दीडपट पाणी घेऊन चार ते पाच तास भिजवून ठेवा. बडीशेप भिजवताना त्यामध्ये एक ते दोन हिरव्या वेलच्या भिजवायला टाका. चार तासानंतर ही बडीशेप मिक्सर च्या भांड्यात घेऊन भिजवलेले पाणी आणि अर्धा कप अजून जास्तीचे पाणी घालून मिक्सरमधून त्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्या.

  2. 2

    ही तयार झालेली पेस्ट एका मलमलच्या कपड्यात घेऊन दाबून हाताने पिळून त्याचे पाणी काढून घ्या. (मलमलच्या कपडा नसेल तर गाळणी च्या साह्याने दाबून दाबून त्याचे पाणी काढून घ्या) दुसऱ्या बाजूला एक सॉस पॅन किंवा जाड बुडाचे भांडे घेऊन त्यामध्ये खडीसाखर आणि साधारण शंभर ते सव्वाशे मिली लिटर पाणी घालून गॅसवर गरम करायला ठेवा. साखर विरघळली आणि पाण्याला चांगली उकळी फुटली की गाळून तयार केलेले बडीशेप चे पाणी या साखरेच्या या मिश्रणात घाला.

  3. 3

    हे मिश्रण चांगले चार ते पाच मिनिटं उकळू द्या आणि उकळताना वर येणारी मळी चमच्याने काढून टाका. आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नसून बोटाला फक्त चिकटपणा जाणवेल असे मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करा. मिश्रण गार होऊ द्या नंतर त्यामध्ये लिंबू फुल (किंवा सायट्रिक ऍसिड) आणि खायचा रंग टाकून व्यवस्थित मिक्स करा

  4. 4

    आपले सरबताचे कॉन्सन्ट्रेट तयार आहे. आता एका ग्लासमध्ये बर्फाचे क्युब्ज, सब्जा,जरुरीप्रमाणे सरबत कॉन्सन्ट्रेट आणि पाणी घालून नीट मिक्स करा आणि थंडगार सर्व्ह करा. याच रीतीने पाण्याच्या ऐवजी थंडगार दूध घालून तुम्ही दुधाचे सरबतही बनवू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes