पनीर काजु पुलावआणि मिक्स पकोडा (Paneer Pulao And Mix Pakoda Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#JPR #झटपट रेसिपीस # सगळ्यांचाच आवडता पुलाव व करण्यासही अगदी सोपा व झटपट भात तयार असेल तर तुम्ही कोणत्याही भाज्या मिक्स करून पुलाव बनवु शकतो चला तर झटपट बनणारा पनीर काजु पुलाव ची रेसिपी बघुया सोबत घोसाळ्याची भजी व कांद्याची खेकडा भजी ची रेसिपी बघुया

पनीर काजु पुलावआणि मिक्स पकोडा (Paneer Pulao And Mix Pakoda Recipe In Marathi)

#JPR #झटपट रेसिपीस # सगळ्यांचाच आवडता पुलाव व करण्यासही अगदी सोपा व झटपट भात तयार असेल तर तुम्ही कोणत्याही भाज्या मिक्स करून पुलाव बनवु शकतो चला तर झटपट बनणारा पनीर काजु पुलाव ची रेसिपी बघुया सोबत घोसाळ्याची भजी व कांद्याची खेकडा भजी ची रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-४ जणांसाठी
  1. 150 ग्रॅम ग्रॅम बासमती तांदुळ
  2. 100 ग्रॅम ग्रॅम पनीर
  3. 25 ग्रॅम ग्रॅम काजु
  4. 1-2 टेबलस्पुनबेदाणे
  5. 3-4मिरच्या
  6. 10कडिपत्याची पाने
  7. 2मोठी वेलची
  8. १०-१२ मिरीचे दाणे
  9. 2दालचिनीचे तुकडे
  10. 5-6लवंगा
  11. चविनुसारमीठ
  12. 1-2 टेबलस्पुनसाजुक तुप
  13. ५० ग्रॅम बेसन पिठाचे बॅटर (मीठ, तिखट, हळद टाकलेले)
  14. 2-3उभे चिरलेले कांदे
  15. २५ ग्रॅम बेसन त्यातच चविनुसार तिखट धने पावडर, मीठ, हळद

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पनीर काजु पुलाव करण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा बासमती तांदुळ20 मिनिटे स्वच्छ धुवुन भिजत ठेवा नंतर पातेल्यात पाणी व मीठ मिक्स करून उकळायला ठेवा उकळी आल्यावर त्यात भिजलेले तांदुळ मिक्स करून भात ९० टक्के शिजवुन घ्या

  2. 2

    शिजवलेला भात चाळणीत उपसुन ठेवा पॅन साजुक तुप गरम करून प्रथम काजु व नंतर पनीर शॉलो फ्राय करून काढुन ठेवा

  3. 3

    पॅन मध्ये खडे मसाले व मिरच्यांचे काप परतुन घ्या त्यात शॉलो फ्राय केलेले काजु परता नंतर त्यात तयार भात मिक्स करा परतुन त्यात शॉलोफ्राय केलेले पनीर मिक्स करा बेदाणे मिक्स कराचविप्रमाणे मीठ मिक्स करा परता

  4. 4

    2 मिनिटे झाकण ठेवुन शिजवा आपला पनीर काजु पुलाव रेडी

  5. 5

    घोसाळ्याच्या चकत्या करून ठेवा बेसनपिठात हळद, तिखट, मीठ मिक्स करून बॅटर बनवा त्यात घोसाळ्याच्या चकत्या टाकुन गरम तेलात भजी तळुन काढा. उभे चिरलेले कांदे बाऊलमध्ये घेऊन त्यात तिखट, मीठ, हळद, धनेपावडर व बेसनपीठ मिक्स करून हाताने कुसकरा त्याला आपोआप पाणी सुटेल नंतर गरम तेलात खेकडा भजी तळुन काढा

  6. 6

    पसरट ट्रेमध्ये गरमागरम पनीर काजु पुलाव वरून शॉलो पनीर, बेदाणे व काजुने डेकोरेट करा सोबत गरमागरम घोसाळ्याची व कांद्याची खेकडा भजी देऊन डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (3)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
धन्यवाद आर्याताई, जास्मिन जी🙏🙏😁

Similar Recipes