वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 जणांसठी
  1. 1 कपमोड आलेले वाल
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 5-6कढीपत्याची पाने
  5. 1/2 टिस्पून हळद
  6. 2 टिस्पून लाल तिखट
  7. 1/2 टिस्पून हिंग
  8. 1/2 टिस्पून जीर
  9. 1 टिस्पून गोडा मसाला
  10. 1 टिस्पून गूळ
  11. वाटणासाठी
  12. 1मोठा कांदा उभे पातळ काप
  13. 1/2 कपकिसलेल सुक खोबर
  14. 1 टिस्पून खसखस
  15. मीठ चवीनुसार
  16. कोथिंबीर आवडीनुसार
  17. तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम वाल भिजत घालून, मोड आल्यावर सोलून घ्यावेत. नतर कांदा आणि सुक खोबर भाजून थंड झाल्यावर मिक्स मधून बारीक करून घ्यावेत

  2. 2

    कढईत तेल तापल्यावर जीरे कढीपत्ता फोडणी करावी.

  3. 3

    नंतर त्यात कांदा घालून परतून घ्यावेत, नतर टोमॅटो आणि मीठ,हळद घालून परतून घ्यावेत.

  4. 4

    कांदा आणि टोमॅटो मऊ झाल्यावर, लाल तिखट, गोडा मसाला घालून परतून घ्यावेत.

  5. 5

    आता मिश्रणात वाटण घालून तेल सुटे पर्यंत परतून घ्यावेत.

  6. 6

    आता वाल घालून छान मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्यावेत.

  7. 7

    वाल शिजल्यावर त्यात गुळ,कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

  8. 8

    गरमागरम वरणभात किंवा पोळी,भाकरी सोबत खाण्यास द्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes