चणा मसाला ग्रेव्ही (Chana Masala Gravy Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#GRU चणा मसाला

चणा मसाला ग्रेव्ही (Chana Masala Gravy Recipe In Marathi)

#GRU चणा मसाला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीट
२ लोक
  1. 1 कपछोटे चणे (रात्रभर भिजत घातलेले)
  2. 1कांदा बारीक चीरलेला
  3. 1/2टोमॅटो
  4. 10लसुन पाकळ्या
  5. 2 टे. स्पुन ओल खोबर
  6. 2 टे. स्पुन सुक खोबर
  7. 1/2 टे. स्पुन जीरे पावडर
  8. 1/4 टे. स्पुन धने पावडर
  9. 1 टे. स्पुन लाल तिखट
  10. 1/4 टे. स्पुन हळद
  11. चवीपुरते मीठ
  12. 1/4 टे. स्पुन मोहरी
  13. 1/4 टे. स्पुन जीरे
  14. 2 टे. स्पुन तेल
  15. 1/4 टे. स्पुन हिंग
  16. कोथिंबीर
  17. 1उकडलेला बटाटा

कुकिंग सूचना

१५ मिनीट
  1. 1

    प्रथम सर्व सामान एकीकडे ठेवुन घ्यावें कुकर मधे चणे तीन शीट्टया करुन शीजवुन घ्यावेत.

  2. 2

    मिक्सर मधे खोबर कांदा, व लसुन वाटुन पेस्ट करु घ्यावी. एका प्लेट मधे तिखट,हळद, काळा मसाला, व धनेजीरे पुड मिक्स करुन ठेवावी.

  3. 3

    कढई मधे तेल मोहरी ची फोडणी करुन हिंग जीरे व कडीपत्ता घालावा, नंतर वाटलेले खोबर घालावे व कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतुन घ्यावे व तेल सुटु लागेल, टोमॅटो घालावा व तोही चांगला शिजवुन घ्यावा.उकडलेला बटाटा घालावा.

  4. 4

    प्लेट मधील मिक्स केलेले मसाले घालावेत व परतुन घ्यावेत.उकडलेला बटाटाव चणे घालावेत. व परतुन मग पाणि घालुन शीजवुन घ्यावेत.मीठ घालावे.

  5. 5

    तयार आहे चणे मसाला ग्रेव्ही.पोळी भात, भाकरी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes