श्राद्ध थाळी (Shradh Thali Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

#PPR
#पारंपारीक रेसिपी
श्राद्ध थाळी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण ठेवतो. त्यामध्ये आपल्या पित्रांच्या आवडत्या रेसिपी आपण करत असतो. त्याचप्रमाणे इतरही पारंपारिक रेसिपी करून आपण पित्रांना आठवण ठेवून आणि श्रद्धापूर्वक ही वाढी बाहेर ठेवतो, अशीही पारंपारिक प्रथा किंवा श्रद्धा आहे.

श्राद्ध थाळी (Shradh Thali Recipe In Marathi)

#PPR
#पारंपारीक रेसिपी
श्राद्ध थाळी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण ठेवतो. त्यामध्ये आपल्या पित्रांच्या आवडत्या रेसिपी आपण करत असतो. त्याचप्रमाणे इतरही पारंपारिक रेसिपी करून आपण पित्रांना आठवण ठेवून आणि श्रद्धापूर्वक ही वाढी बाहेर ठेवतो, अशीही पारंपारिक प्रथा किंवा श्रद्धा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दोन तास
चार
  1. 1 वाटीतुरीची डाळ वरणासाठी
  2. 1 वाटीतांदूळ भातासाठी
  3. 1 वाटीउडीद डाळ चार तास भिजवून, एक चमचा जीरे भाजून क्रश करून
  4. 1 वाटीगव्हाच्या जाडसर पीठ, १ पिकलेलं केळ,तीन चमचे गूळ वेलची
  5. तांदूळ चना हिरवे मूग प्रत्येकी अर्धा वाटी भिजवून. अळूची ६ पानं
  6. 1/2 वाटीखोबरे चार सुक्या लाल मिरच्या, २ 🥄 धणे,चिंच गूळ
  7. 1 वाटीभिजवलेले मूग सुरणाच्या फोडी १५-२०
  8. 1 वाटीगव्हाचे पीठ व मीठ,घट्ट मळून पुरीसाठी
  9. 1/2 वाटीबासमती तांदूळ खरपूस भाजून आणि रवाळ दळून खिरीसाठी
  10. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स अर्धा लिटर दूध अर्धी वाटी साखर
  11. बटाटा, कच्च केळ व कारल्याची स्लाईस करून भजी साठी
  12. 1/4 किलोतोंडली व एक बटाटा लांबट चिरून भाजीसाठी
  13. 1 बांगडा दोन भाग करून व हळद मीठ मिरची लावून
  14. 2 वाट्याइडलीचे पीठ
  15. 1 वाटीखोबरं तीन आमसूलं, अर्धा चमचा जीरे मीठ व साखर चवीप्रमाणे
  16. पुरी, भजी करण्यासाठी गरजेप्रमाणे तेल
  17. 3मोठे बटाटे उकडून फोडी करून घ्याव्यात
  18. आलं लसूण मिरची क्रश करून दोन चमचे बटाटवड्याच्या भाजीसाठी

कुकिंग सूचना

दोन तास
  1. 1

    अळूवडीसाठी भिजवलेले तांदूळ चणाडाळ मुग वाटून घ्यावे त्यात खोबरं सुकी मिरची धने, चिंच-गुळ ह्याचे वाटण घालून मीठ घालून अळूच्या पानावर पसरून नेहमीप्रमाणे वळकटी करून अळूवडी शिजवून घ्यावी त्याबरोबरच इडली आहे शिजवून घ्याव्यात.

  2. 2

    नंतर बासमती तांदूळ रवा तुपामध्ये परतून त्याबरोबरच ड्रायफ्रूट्स परतून घ्यावे आणि दुधाबरोबर शिजवून घ्यावेत त्यात आवडीप्रमाणे साखर आणि वेलची पावडर घालून खीर तयार करून घ्यावी.

  3. 3

    उभ्या चिरलेल्या तोंडली आणि बटाट्याला फोडणी घालण्यासाठी कढईत एक पळी तेल त्यात राई अर्धा चमचा तीन सुक्या मिरच्या कापून पंधरा-वीस कढीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग ही फोडणी तडतडल्यावर भाजी घालून, मीठ घालून पाणी न घालता मंद आचेवर झाकून ठेवावी. पाच मिनिटानंतर भाजी शिजल्यावर त्यात दोन-तीन चमचे ओलं खोबरं टाकून दोन मिनिटे झाकून छान भाजी तयार करून घ्यावी.

  4. 4

    कारल्याच्या भजीसाठी, कारल्याच्या चकत्यांना तांदळाचे पीठ आणि लाल तिखट आणि मीठ लावून थोडा वेळ ठेवून गरम तेलात मध्यम आचेवर छान कुरकुरीत भजी तळून घ्यावित.

  5. 5

    बेसन नेहमीप्रमाणे मीठ हळद मिरची घालून जाडसर भिजवून घ्यावे त्यात केळी आणि बटाट्याच्या चकत्यांची भजी करून घ्यावी.
    उकडलेल्या बटाट्याचे फोडी करून त्यात आलं लसूण मिरचीचं केलेलं क्रश व मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घालावी. हळद घालावी.आणि बटाट्याच्या वड्यांचे गोळे करून भजीच्याच बेसनामध्ये बुडवून त्याच तेलात तळून घ्यावेत

  6. 6

    घारीसाठी उडदाची भिजवलेली डाळ जाडसर वाटून त्यात भाजलेल्या जिऱ्याचं क्रश अर्धा चमचा, पाव चमचा हिंग व मीठ घालून नीट मिक्स करून गोल गोल वडे तेलात तळून घ्यावे

  7. 7

    उंबरासाठी- १ वाटीजाडसर गव्हाचे पीठ वेलचीपूड, एक केळं,थोडा गुळ आणि मीठ, दोन चिमटी खायचा सोडा हे घट्टसर मिक्स करून त्याची उंबरं तुपात तळून घ्यावे.

  8. 8

    शिजवलेल्या तूर डाळीला चांगलं घोटून. भांड्यात एक पळी तेल त्यात राई, सुकी मिरची तोडून, दोन पंधरा वीस कढीपत्त्याची पानं आणि हिंग टाकून शिजलेली डाळ त्यावर टाकून हवं तितकं पातळ करून उकळ काढून घ्यावे. वरण तयार.

  9. 9

    पुरी साठी घट्ट मळलेल्या पिठाच्या पुऱ्या लाटून गरम तेलात तांबूस रंगात तळून घ्याव्यात.

  10. 10

    मॅरीनेट केलेल्या बांगड्याला बारीक रव्यात घोळवून पॅनमध्ये थोडं तेल टाकून छान शॅलो फ्राय करून घ्यावे.

  11. 11

    आमटीसाठी- सुकी मिरची, धणे, खडा हिंग थोडं तेलात परतून त्यात खोबरं आणि चिंच गूळ घालून छान वाटण बारीक वाटून शिजवलेल्या मूग व सुरणा मध्ये घालून आवश्यकतेनुसार मीठ घालून व गरजेप्रमाणे पातळ करून एक उकड काढून घ्यावी. खोबरेल तेलात राई,कडीपत्ता व हिंग घालून तडतडल्यावर तयार फोडणी आमटीत घालून एक उकळी करून घ्यावी आमटी तयार.

  12. 12

    आमसुलाच्या चटणीसाठी असलेले साहित्य -खोबरं, जिरं आमसूल,मीठ, साखर,मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे छान गुलाबी रंगाची चविष्ट अशी आमसुलाची चटणी तयार इडली बरोबर वाढण्यासाठी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes