वाटली डाळ (Vatli Dal Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BPR चणाडाळ ची अतिशय टेस्टी व गौरी गणपतीला व नैवेद्यासाठी केलेली जाणारी ही डाळ नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो

वाटली डाळ (Vatli Dal Recipe In Marathi)

#BPR चणाडाळ ची अतिशय टेस्टी व गौरी गणपतीला व नैवेद्यासाठी केलेली जाणारी ही डाळ नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीचणाडाळ पाण्यात सहा तास भिजलेली
  2. दीड टेबलस्पून तेल
  3. 3हिरव्या मिरच्या, एक इंच आलं
  4. 1/4 चमचाहळद अर्धा चमचा तिखट
  5. 1/4 वाटीखोवलेलं ओलं खोबरं व त्याच्या निम्म धून बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. मीठ चवीनुसार
  7. अर्धा चमचा साखर
  8. 1/2 चमचामोहरी
  9. अर्धा चमचा जीरे ,पाव चमचा हिंग
  10. 15कढीपत्त्याची पाने
  11. 1/2लिंबाचा रस

कुकिंग सूचना

40मिनिट
  1. 1

    प्रथम भिजलेली चणाडाळ पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यात घालावी त्यामध्ये मिरची व आलं घालून सर्व सरबरीत वाटून घ्यावं.

  2. 2

    कढईमध्ये तेल घालूनते गरम झालं की त्यामध्ये हिंग,मोहरी,जिरं,कढीपत्ता व हळद घालून खमंग फोडणी करावी व त्यामध्ये वरील वाटलेलं वाटण घालून छान एकजीव करावं त्यामध्ये मीठ साखर,तिखट घालून एकजीव करून मंद गॅसवर सर्व मिश्रण शिजू द्यावं व सारखं परतत राहावं

  3. 3

    सात ते आठ मिनिटांनी डाळ छान शिजते व मोकळी होते त्यामध्ये थोडे खोबरं व कोथिंबीर, लिंबूरसघालून परत एकजीव करावं व अजून दोन ते तीन मिनिटे वाफ काढावी डाळ छान सुट्टी झाली म्हणजे आपली वाटली डाळ तयार झाली त्यावर उरलेलं खोबरं कोथिंबीर घालून सर्व्ह करावं.

  4. 4

    खूप टेस्टी होते व सकाळच्या नाश्त्यासाठी आपणही खाऊ शकतो व गौरी गणपतीच्या सणाला नैवेद्यही दाखवू शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes