आंबट चुका भाजी (Ambat Chuka Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#KGR
आंबट चुका भाजी आंबट-गोड असून, वातदोष कमी करते. पचनास हलकी असून, जेवणास चव आणणारी आहे. भूक लागत नसल्यास किंवा भूक लागूनही जेवण जात नसल्यास चुक्याच्या भाजीमुळे भूक लागते, जेवण जाते आणि पचनक्रियाही सुरळीत होते. ही भाजी थंड असल्याने हातापायांची जळजळ, मूत्रमार्गाचा दाह, आदी उष्णतेच्या विकारात भाजीचा उपयोग होतो. चला तर मग बघुया आंबट चुक्याची भाजी कशी करायची.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

39 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. आंबट चुका वनस्पतीची कोवळी पाने व फांद्या
  2. शेंगदाणे
  3. हरभरा डाळ
  4. खोबरे
  5. लसूण
  6. आले
  7. लाल तिखट
  8. हळद
  9. तेल
  10. मोहरी
  11. हिंग
  12. जीरे
  13. गुळ
  14. बेसन पीठ
  15. मीठ

कुकिंग सूचना

39 मि
  1. 1

    चुक्याची भाजी स्वच्छ धुऊन भाजी तयार करण्यासाठी चुक्याची पाने, कोवळ्या फांद्या व खोड घेऊन बारीक चिरावी. चिरलेले आंबट चुक्याची भाजी,शेंगदाणे व हरभरा डाळ एकत्र करून कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन शिजवून घ्यावी.

  2. 2

    कुकर थंड झाल्यावर भाजी रवीने ढवळून घेऊन त्यामध्ये पाण्यात कालवलेले बेसन पीठ त्यामध्ये घालावे व नीट मिक्स करून घ्यावे. सुके खोबरे, आले, लसूण वाटून घ्यावे.

  3. 3

    कढईमध्ये तेल घालून, मोहरी, हिंग,जिऱ्याची फोडणी करून त्यात खोबरे आले-लसूण वाटण घालावे. शिजवलेली चुक्याची भाजी, डाळ व शेंगदाणे घालावेत. नंतर चवीनुसार मीठ आणि गूळ घालून मंद आचेवर चांगली उकळी येईपर्यंत भाजी शिजू द्यावी. मधूनमधून भाजी हलवावी.

  4. 4

    आजारातून उठल्यावर तोंडाला चव येण्यासाठी ही भाजी अवश्य खायला हवी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

Similar Recipes