चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BR2
ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते

चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)

#BR2
ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2जुड्या चाकवत भाजीच्या साफ करून त्याची पानं काढलेली व स्वच्छ धुऊन घेतलेली
  2. 1/2 वाटीमूग डाळ अर्धा वाटी तूर डाळ अर्धा वाटी चणाडाळ अर्धा वाटी शेंगदाणे
  3. 15लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या
  4. 1/4 चमचाहळद दीड चमचा तिखट
  5. थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कापलेली
  6. चवीनुसारमीठ सुपारी एवढा गूळ
  7. 2ते तीन कोकम
  8. 1 टेबल स्पूनतेल
  9. 1/2 चमचामोहरी पाव चमचा मेथी दाणा व चिमुटभर हिंग

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    कुकरच्या भांड्यामध्ये चाकवत भाजी व दुसऱ्या भांड्यामध्ये डाळी व शेंगदाणे स्वच्छ धुऊन त्यामध्ये पाणी घालून कुकरला छान चार ते पाच शिट्ट्या करून शिजवून घ्यावे

  2. 2

    मग दोन्ही एकत्र करून छान घोटून घ्यावे त्यामध्ये हळद तिखट मीठ गूळ कोकम घालून उकळत ठेवावे

  3. 3

    दुसऱ्या गॅसवर फोडणीसाठी छोटं कडल ठेवून त्यामध्ये हिंग मोहरी मेथी व कापलेला लसूण घालून तो छान लाल होऊ द्यावा वरील भाजीवर घालून एकजीव करावे थोडी कोथिंबीर घालावी व थोडी गार्निशिंगसाठी ठेवावी छान पंधरा ते वीस मिनिटे भाजी उकळी किती रेडी होते ती गरम गरम भाताबरोबर व भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो अतिशय टेस्टी अशी ही भाजी होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes