"गुळ शेंगदाणे लाडू"(Gul Shengdane Ladoo Recipe In Marathi)
"गुळ शेंगदाणे लाडू"
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे भाजून,साल काढून घ्या. मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. गुळ पावडर नसेल तर गुळ बारीक कापून घ्या..
- 2
मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे कूट,गुळ पावडर घालून, तूप घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.. दोन टेबलस्पून शेंगदाणे कूट घालून मिक्स करा व लगेच हव्या त्या आकारात लाडू वळून घ्या.
- 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryगुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त. Mangala Bhamburkar -
शेंगदाणे लाडू (Shengdane Ladoo Recipe In Marathi)
#महाशिवरात्र_स्पेशल#SR उपवासाच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही एनर्जी बूस्टर म्हणून काम करणारे शेंगदाणे लाडू हे प्रोटीन्स आणि लोह (iron) यांचे पाँवर हाऊस (Power House) म्हणावे लागेल . शेंगदाणे लाडू ही अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट तसेच झटपट होणारी रेसिपी तर आहेच शिवाय ही आबाल वृद्धांनाही अतिशय प्रिय अशी रेसिपी म्हणता येईल. वाढत्या वयाच्या मुलांच्या वाढीसाठी तर शेंगदाणा लाडू हे वरदानच म्हणता येईल. मला आठवतंय लहानपणी आम्ही दुपारच्या वेळी एका वाटीत दाणे आणि गूळ घेऊन खात असू . छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून शेंगदाणे लाडूची निवड करता येईल तसेच जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावे अशी इच्छा होते त्यावेळेस साखरेला पर्याय म्हणून हा एक छोटा लाडू बिनधास्त खावा. शेंगदाणे लाडू हवाबंद डब्यामध्ये दोन महिने आरामात टिकतात. हे जरी खरे असले तरी डब्यातले लाडू इतक्या लवकर कधी संपतात हे कळत देखील नाही. Bhagyashree Lele -
-
गुळ शेंगदाणे खजुराचे पौष्टिक लाडू (gul shengdana khajur ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळगुळ शेंगदाणे आणि खजुराचे हे पौष्टिक लाडू अगदी झटपट होता.. लहान मुलापासून आजी-आजोबा पर्यंत सर्वांसाठी आर्यन डिफीसीयेन्सी तळण्यासाठी हे लाडू अगदी उत्तम पर्याय आहे. शेंगदाणा ऐवजी तुम्ही काजू-बदाम यांचा वापर देखील करू शकता. ज्यांना खजूर नुसताच खायला आवडत नसेल, तर असे लाडू करून खाण्यास दिले, तर नक्कीच खाल्ले जातात. हा माझा स्वतःचा अनुभव....आणि म्हणूनच या दिवाळीमध्ये सुरुवात मी या लाडू पासून केली.. Vasudha Gudhe -
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdyane ladoo recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_jaggeryगुळामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक असतात. लोहाचे प्रमाणही गुळामध्ये जास्त असते त्यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. पुर्वी बाहेरून व्यक्ती आली की तिला गुळ आणि पाणी दिले जायचे. आयुर्वेदात गुळाला खूप महत्व आहे.हाच गुळ रोज खाल्ला जावा म्हणून त्याचे हे केलेले लाडू..😊 जान्हवी आबनावे -
तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
#मकर#तीळगुळलाडूतीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला..🙏😊 मकर सक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळेच हे लाडू बनवतो ... मी कशा प्रकारे करते आज शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#लाडुलाडु म्हटल की लगेच तोडाला पाणी सुटते अगदी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडीचा लाडु कोणीही बाहेर आल की पहिले डब्यात हात घातला की लाडु काढायचा आणि खायचा असाच दिनक्रम घरा घरात असतो.... बरोबर ना..म्हणुनच झटपट लाडु रेसिपी सांगणार आहे कुकपॅड नेहमीच खुप छान छान थीम देत असत होईल तेवढ्या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करते 😍 तर आपण आज बनवणार आहोत आरोग्यासाठी उपयुक्त असे रक्त वाढवण्यासाठी अशक्तपणा दुर करण्यासाठी आणि तंदुरुस्ती साठी साधे सोपे झटपट असे गुळ शेंगदाण्याचे लाडु या लाडुंचे असंख्य फायदे आहे. फक्त शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने जास्त आरोग्य फायदे मिळतात.शेंगदाण्यासोबत गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.हिवाळ्यात शेंगदाणे आणि गुळाची चिक्की खाण्याचा सल्ला आम्ही पेशंट ला देतो.यामुळे बॉडी उष्ण राहते. आणि महिलांनी कोणत्या कंडिशन्समध्ये खावेत गुळ आणि शेंगदाणे लाडु?तर....प्रेग्नेंसीच्या काळात शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन प्रॉपर होते. यामुळे यूटरसचे फंक्शन्स प्रॉपर होतात. हे बाळाची ग्रोथ प्रॉपर होण्यासाठी मदत करतात. पीरियड्सच्या काळात हे खाल्ल्याने कंबरदुखीसारख्या समस्या दूर होतात.म्हणुन ही रेसिपी नक्की करून बघा आणि रोज सकाळी एक लाडु खायला विसरू नका. Vaishali Khairnar -
वाॅलनट गुळ लाडू (walnut gul ladoo recipe in martahi)
#walnuttwistsकरायला सोपे , कमी साहित्य आणि तरीदेखील पोष्टिक तिने परिपूर्ण असलेले हे लाडू..... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
शेंगदाणे चे लाडू (shngdanche ladoo recipe in marathi)
#GA4#Week15Jiggery ह्या की वरुन शेंगदाणे लाडू केले. हिवाळ्यात तर हा लाडू सगळ्यात छान. Sonali Shah -
शेंगदाणे गुळ पापडी (shengdane gud papdi recipe in marathi)
#GA4 #week 15Jaggery गुळ हा किवर्ड ओळखून गुळाची पापडी बनविली. बाहेरून घेऊन आणून खाण्यापेक्षा घरी केलेली कधी पण चांगली. Archana bangare -
-
राजगिरा लाडू (rajgira ladoo recipe in marathi)
# GA4 #week15#राजगिरा लाडू#Amarnath आणि jaggery हा keyword ओळखून राजगिऱ्याचे लाडू गूळ आणि शेंगदाणे टाकून करत आहे. राजगिरा पासून अनेक पदार्थ तयार करता येतात. राजगिरा उपवासाला चालणारा पदार्थ आहे. पचायला अतिशय हलका आहे. राजगिऱ्याचे लाडू एकदम झटपट होतात. rucha dachewar -
गुळ- शेंगदाणे चे लाडु (gud shengdane che ladoo recipe in marathi)
#GA4#week15 या आठवड्याची माझी रेसिपी झटपट होनारी.मुलांना सोपा & पटकन करून देता येणारा खाऊ.महत्वाचे म्हणजे या लाडु मुळे मुलांचे पोट हि भरते & त्यांना ऊर्जा हि मिळते. Shubhangee Kumbhar -
गुळ आणि चुरमुरे लाडू (gud and churmure ladoo recipe in marathi)
गुळ, हा किवड निवडून मी गुळ चुरमुरे लाडू केले आहेत. #GA4 #week 15. Anjali Tendulkar -
शेंगदाना, तीळ, मखाना लाडू रेसिपी (makhana ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 # शेंगदाना तीळ मखाना गुळ लाडू रेसपी हे पोष्टिक असे लाडू तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
गुळ शेंगदाणा लाडू (gud shengdana ladoo recipe in marathi)
श्रावण स्पेशल गोड रेसिपी....आज श्रावणातला पहिला सोमवार....मी वैशाली खैरनार मॅडमची गुळ शेंगदाणा लाडू ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त लाडू झाले.झटपट,चविष्ट आणि पौष्टिक. Preeti V. Salvi -
पौष्टीक शेंगदाणा लाडू (Shengdana Ladoo Recipe In Marathi)
#WWR #पुर्वी पासुनच खेडेगावातल्या माणसांच्या आहारात शेंगदाणे व गुळ मोठ्या प्रमाणात वापर ले जात होते त्यामुळे त्यांची तब्बेत व आयुष्यमान ही वाढलेले दिसते आज आपल्या मुलांना अशाच पौष्टीक आहाराची गरज आहे. म्हणुन मी माझ्या मुलासाठी खास पौष्टीक शेंगदाणा लाडू बनवले चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
खजूर शेंगदाणे उपवासाचे लाडू (khajur shengdane ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण महिना सात्विक रेसिपी करण्याचा महिना. यासाठी मी उपाससाठी हेल्दी व पित्त न होता खाण्यासारखे, आयर्न व कॅल्शियम युक्त स्पेशल लाडू केलेत. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
गुळ पापडी लाडू (gul papadi laddoo recipe in marathi)
#gur-बाप्पा लवकर येत आहे, त्याच्या आगमनाची तयारी सुरू आहे पण मी गोविंदलाडू लाडू केले आहेत. बाप्पालाही हे लाडू नक्की आवडतील.. Shital Patil -
गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#गुळपापडी लाडूमाझ्या आवडीचे गुळपापडीचे लाडू. झटपट होणारे आणि पौष्टिक असे हे लाडू. Sujata Kulkarni -
गूळ तूप पोळीचा लाडू (gul tup policha laddu recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीजगूळ तूप पोळीचा लाडू हल्ली विस्मरणात चालला आहे.पूर्वीच्या काळी मुलांना भूक लागली की आई पटकन पोळी चुरून गुळ पोळी चे लाडू करून द्यायची गुळ तूप पोळीचा लाडू खूप हेल्दी व पौष्टिक असा आहे कारण त्यात गव्हाची पोळी गुळ व तूप असे सर्व शक्तिवर्धक बलवर्धक आहेत.हा लाडू एकदम कमी साहित्य व झटपट होणारा असा आहे चला तर मग बघुया गुळ तूप पोळीचा लाडू. Sapna Sawaji -
शेंगदाणा लाडू (shengdane ladoo recipe in marathi)
#GA4 #week14#लाडूगोल्डन ऍप्रॉन मध्ये लाडू हा कीवर्ड ओळखून मी झटपट होणारे शेंगदाणा लाडू बनवले आहेत. झटपट आणि पौष्टिक असे खास हिवाळ्या मध्ये खाण्यासाठी लाडू रेसिपी पोस्ट करत आहे. उपवासाला ही हे लाडू खाऊ शकता. लहान मुलांना झटपट करून देण्यासाठी खूप छान हे हेल्दी लाडू आहेत. Rupali Atre - deshpande -
गुळ,तुप, चपाती लाडू (gul tup chapati laddu recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फुड डे स्पेशल रेसिपीज#माझी आवडती रेसिपी "गुळ, तुप, चपाती लाडू"लहानपणापासून च आवडीचा लाडू.. खुप खावासा वाटतो..पण शुगर नावाचं भुत अंगात शिरल्यापासुन असे काही गोड पदार्थ खायला बंदी घातली आहे.. काय करणार..पण कधीतरी खायला काय हरकत आहे.. म्हणून आज माझी आवडती रेसिपी.. लता धानापुने -
गुळ पापडी लाडू (gul papdi ladoo recipe in marathi)
# लाडू# गणपती बाप्पा घरी जातो तेव्हा त्याला शिदोरी म्हणून हे लाडू देतात.Pradnya khadpekar
-
शेंगदाणे,काजू,बदाम लाडू(Shengdana Kaju Badam Ladoo Recipe In Marathi)
#SRमहाशिवरात्री स्पेशल रेसिपीस.ही माझी ६१५ वी.रेसिपी आहे. Sujata Gengaje -
शेंगदाणे खोबरे गुळ मोदक (shengdane gul khobre modak recipe in marathi)
#मोदक मैत्रिणींनो , गणेशोत्सवाच्या काळात रोज बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी त्यांच्या आवडीचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करणे आलेच. मी ही आज घरी असलेल्या पदार्थांमधून मोदक केलेय. हरितालिकेच्या दिवशी ओल्या नारळातील खोबरे शिल्लक होते. एवढेही नव्हते की त्याच्या वड्या करता येईल. म्हणून मग त्याचा वापर करुन मोदक केलेय. बघा तर... Varsha Ingole Bele -
मकर संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की (gud shengdane chikki recipe in marathi)
#मकर संक्रात...आपली भारतीय संस्कृती ही सण-उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतूमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण-उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते!गुळ आणि शेंगदाणा हे दोघी खुप पौष्टिक आहार मानले जातात.तर मग बनवूया संक्रांत स्पेशल गुळ शेंगदाणा चिक्की... Vaishali Dipak Patil -
-
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू#weekly theam#गोपाळकाला प्रसाद जन्माष्टमी निमित्ताने आज लाडू चा प्रसाद केला. गव्हाचे पीठ & गुळ सुरेख चव आली आहे. Shubhangee Kumbhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16813495
टिप्पण्या