बटाटा मटार भाजी (batata matar bhaaji recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#श्रावण #सात्विक रेसिपी
श्रावण महिन्यात अनेक जण कांदा, लसूण खात नाहीत मग अशा वेळेला बऱ्याच जणींना प्रश्न असतो की जेवणाला चव कशी येणार? त्या साठीच आजची रेसिपी सोपी आणि तरीही चवदार... माझ्या सासूबाई चातुर्मास पाळायच्या त्यामुळे कोणतीही भाजी कांदा लसूण शिवाय करण्याची सवय आपसूक लागली. तुम्ही पण ही भाजी करून बघा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठा बटाटा
  2. 1मध्यम टोमॅटो
  3. 1 वाटीमटार दाणे
  4. 1-2सुक्या मिरच्या
  5. 1/2 टीस्पूनबडीशेप
  6. 1/2 टीस्पूनजिरे
  7. 1/4 टीस्पूनओवा
  8. 1/4 टीस्पूनमेथी दाणे
  9. 1 टेबलस्पूनतिखट
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनधना जिरे पावडर
  13. मीठ चवीनुसार
  14. कोथिंबीर
  15. कसुरी मेथी
  16. दही (optional)
  17. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    बटाटे, टोमॅटो तुमच्या आवडीनुसार चिरून घ्या. फोडणीसाठी तेल घेऊन त्यात जिरे, मेथी दाणे, बडीशेप, ओवा, सुक्या मिरच्या घाला. चांगली फोडणी आली की त्यात हळद घालून बटाटे घाला. ते थोडे परतून घ्यावे आणि मग त्यात टोमॅटो घालून झाकण ठेवून वाफ काढा.

  2. 2

    नंतर त्यात तिखट आणि सर्व मसाले घालून मिनिटभर परतून घ्यावे आणि त्यात मटार दाणे घालून एकत्र करावे. झाकण ठेवून ५-७ मिनिटे शिजवा. गरजेप्रमाणे पाणी घाला. वाटाणा चांगला शिजला की त्यात मीठ घालून मिक्स करा. वरतून कसुरी मेथी आणि दही घालून मिक्स करा. कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes