पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

।।।।।सण वर्साचा हा गौरी गणपती
इथ येईल आनंदाला भरती.....
साडी चोळी नवी नेसुन मिरवायाला
गौरी गणपतीच्या सणाला
बंदु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला....।।।।।
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
।।।।।सण वर्साचा हा गौरी गणपती
इथ येईल आनंदाला भरती.....
साडी चोळी नवी नेसुन मिरवायाला
गौरी गणपतीच्या सणाला
बंदु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला....।।।।।
कुकिंग सूचना
- 1
भिजविलेली चणाडाळ चिमूटभर हळद आणि मीठ घालून ३-४ शिट्ट्या शिजवून घ्यावे.डाळ चाळणीत काढून तिचे उरलेले पाणी म्हणजेच "कट" वेगळा बाजूला काढावा. (या कटाचीच प्रसिद्ध आमटी बनते.)
- 2
पूरण शिजवण्यासाठी एका कढईत १ टेबलस्पून तूप घालून त्यात शिजलेली चण्याची डाळ (गरम असतानाच) घालावी आणि बरोबरच किसलेला गूळही घालावा. मध्यम आचेवर गूळ पूर्ण विरघळून द्यावा. १०-१५ मिनिटांत पुरण शिजत आले की त्यातील गुळाचा रस आटत येऊन डाळीत एकजीव होतो. (पुरण शिजले कि नाही हे पाहण्यासाठी त्याच्या मधोमध कढईत एक चमचा उभा करून ठेवावा, जर तो चमचा नीट उभा राहिला तर समजावे कि पुरण शिजले!). वेलचीपूड आणि जायफळ पूड घालावी. पूरण थंड झाले कि ते पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून फिरवून बारीक वाटून घ्यावे.
- 3
मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि हळद घालून एकत्र मिसळून घ्यावी. १ टेबलस्पून तेल घालून पिठात चांगले रगडून घ्यावे जेणेकरून पोळ्या खुसखुशीत होतात. थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे. सुती ओल्या कपड्याने ३० मिनीटे झाकून ठेवावे.
- 4
पीठाच्या गोळ्यात पूरण भरून तांदळाच्या पिठावर पोळी लाटावी.
- 5
तवा मध्यम आचेवर गरम करून पोळी दोन्ही बाजूंनी भरपूर तूप घालून खरपूस गुलाबी करड्या रंगावर भाजून घ्यावी.
- 6
गरमागरम सर्व्ह करावे!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11पुरण पोळी, एक आपली रेसिपी, आपल्या महाराष्ट्रीय समृद्ध संस्कृतीतले आणि विस्तृत खाद्यसंस्कृतीतले एक खमंग पान. ही रेसिपी इतकी आपली आहे की महाराष्ट्राला पुरणपोळीचा जिओ टॅग मिळायला हवा. तुम्ही आपल्या पद्धतीच्या अनेक रेसिपी बनवू शकत असालात तरी पुरणपोळी हा एक सर्वमान्य मापदंड आहे. पुरणपोळी करता आली म्हणजे मराठी पद्धतीचे जेवण बनविण्याची बॅचलर्स डिग्री मिळण्यासारखे असते."होळी रे होळी, पुरणाची पोळी..." अशी आरोळी प्रसिद्धच आहे. पण पुरणपोळी होळीपुरता मर्यादित नाही. पाडवा असो वा पोळा, गौरी-गणपती असो वा कृष्ण, जिथे कुठे सर्वोत्तम गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्याची इच्छा होइल, किंवा गृहिणीला आपले कसब दाखवून कुणा खास पाहुण्यांचे स्वागत करायचे असेल तर पुरणपोळी सारखा पर्याय नाही.पुरणपोळ्या विकत मिळत असल्या तरी तो अगदीच अडचणीत सापडलेल्यांसाठी शेवटचा पर्याय असू शकतो. पण पुरणपोळी बनविण्याची नाही तर ती साजरी करण्याची गोष्ट आहे. आदल्या रात्री डाळ भिजत घालण्यापासून याची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी ती डाळ उकडणे, त्यात गूळ घालून शिजवणे, पुरण यंत्रातून त्याचे पुरण करणे, हे सगळे लाड आधी पुरवावे लागतात. घाटण्याचा, पुरण यंत्र फिरविण्याचा नाद स्वयंपाकघरात घुमायला हवा. पुरणाच्या गोळ्यांचा आणि मऊ पिठाचा स्पर्श हाताला व्हायला हवा. अलगद, मायेने पण सराईतपणे लाटणे गोळ्यावरुन फिरायला हवे. तव्यावर फुगलेल्या पुरणपोळीवर साजूक तुप लावतानाचा सुगंध घरभर दरवळायला हवा. आणि इतके सारे होऊन पुरणपोळी खाण्यासाठी मन आतुर झाले असताना आधी देवाला नेवैद्य दाखवेपर्यंत वाट पहाणे देखील आले. तेव्हा कुठे ही सेलिब्रिटी आपल्या पानात अवतरते. सादर आहे ही आपली मराठमोळी रेसिपी... Ashwini Vaibhav Raut -
पुरणपोळी आणि आंब्याचा रस(puranpoli aani ambyacha rassa recipe in marathi)
#रेसीपीबुक महाराष्ट्राची आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! मऊसूत पुरणाने गच्च भरलेली , सोनसळी रंगाची , नाजूक किंचित जाडसर लाटलेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो! पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच...माझ्या गावची विशेष डिश म्हणजेच पुरणपोळी अनी आंब्याचा रस. Amrapali Yerekar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीगणपती बाप्पांच्या आगमनानंतर काही घरांमधे गौराई मातेचे आगमन होते. काही ठिकाणी एक उभी गौरी असते, तर काही ठिकाणी दोन उभ्या असलेल्या गौरी असतात. काही ठिकाणी फक्त मुखवट्याच्या गौरी असतात. कोणी गौरी मातेला पंचकक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी गौरीला नाॅनव्हेजचा नैवेद्य पण दाखवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. पण गौरी मातेच्या प्रसादामधे प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या बरोबरच गौरी येतात आणि गणपती बाप्पांच्या बरोबर जेऊन माघारी जातात. मी पुरणपोळी बनवली त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पुरणपोळी
#रेसिपीबुक#पुरणपोळी #week11महाराष्ट्रात मोठ्या सणाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पाडवा, गौरी गणपती, नवरात्र आशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. Arya Paradkar -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11देवीच्या नैवेद्यात पुराणाचे फार महत्व आहे. ह्या गौरी पुजनाला मी पारंपारिक पुरण पोळी केली होती. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11माझ्या कुटुंबात पुरणपोळी सगळ्यांना भरपूर आवडते .विशेष म्हणजे गौरी-गणपतीच्या सणात पुरणपोळी ला विशेष महत्व , गौराई दीड दिवसाची पाहुनी माहेरी आलेली असते आणि तिला गोड-धोड म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. Minu Vaze -
-
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माहेरवाशीण म्हणून गौरी आल्या की त्यांच्यासाठी छान गोडधोड स्वयंपाक केला जातो.प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो.बहिणीच्या सासरी खड्यांच्या गौरी बसतात.मग त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य करतात.यावर्षीही आम्ही गेलो होतो.मस्त पुरणपोळी आणि साग्रसंगीत स्वयंपाक करून नैवेद्य अर्पण केला. Preeti V. Salvi -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Varsha Pandit -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीपुरणपोळी ही सर्वत्र महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. कुठलाही सण असो, त्या सणाला पुरण पोळीचा नैवेद्य हा, महानैवेद्य समजला जातो. कुठले पाहुणे जरी आले, तरीही पुरणपोळीचा पाहुणचार केला जातो. आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून आले आहे. त्यांचा पाहुणचार म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य मी आज करीत आहे. आणि अचानक आमच्याकडे पाहुणे सुद्धा आले. Vrunda Shende -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रेसिपी-1 पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महानैवेदय. प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. गौरी पूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. आमच्याकडे सर्वांना आवडते. Sujata Gengaje -
पुरणपोळी
#पश्चिम #महाराष्ट्रपुरणपोळी म्हणजे महाराष्ट्र लोकांचे पंच पक्वान्न असल्या सारखे जेवण. बहुतेक प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. मग होळी असो नाहीतर पाडवा असो, नाहीतर गौरी गणपती असो. सगळ्यात स्पेशल मेनू दिपाली महामुनी -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीखरंतर गौरीला आमच्याकडे वडे, काळ्या वाटाण्याचे सांबार, खीर वगैरे असा नैवेद्य असतो. आज मी चणाडाळ आणि मुगडाळ मिक्स करून पुरणपोळ्या बनविल्या. Deepa Gad -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11मैदा पेक्षा गव्हाच्या पिठाची पोळी चवीला खूप छान लागते. shamal walunj -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्य नैवेद्य म्हणला कि सगळ्यात आधी येते ती पुरणपोळी. मग तो कोणताही सण असो, पूजा असो कि कोणताही धार्मिक कार्यक्रम असो पुरणपोळी पाहिजेच. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी परफेक्ट जमणे पण एक उत्तम गृहिणी पणाचे लक्षण समजले जाते कारण ही पुरणपोळी बनवणे खूप किचकट आणि वेळखाऊ आहेच शिवाय निगुतीने करायचा पदार्थ आहे. पण एकदा का ही पुरणपोळी नीट जमली कि खाणारा तृप्त आणि करणारा ही समाधानी. Shital shete -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 post1संपूर्ण महाराष्ट्रात गौरी-गणपती साठी पुरणपोळीचा नैवेद्य महत्वाचा असतो. पुरणपोळीच्या थाळीत वरण-भात,कटाची आमटी किंवा सार, कुरडई भजे पापड हे पदार्थांची पण रेलचेल असते. तसेच महाराष्ट्रीयन कुटुंबात ज्या गृहिणीला पुरण पोळी येते तिला सगळा स्वयंपाक येतो असे गृहीत धरले जाते. Shilpa Limbkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माझ्या घरात सणासुदीला गोडधोडाचा स्वयंपाक बनतो. त्यात पुरणपोळी म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणूनच तुमच्या सोबत पुरणपोळी ची रेसिपी शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पूरणा सारखा पवित्र मंगलकारक नैवेद्य नाही . ताट भरून तोंड भरून षडरस युक्त व प्रोटिनयुक्त, व्हिटॅमिन्स असलेली पुरणपोळी हा सुरेख नैवेद्य आहे.पुरणाचे ताट जसे दृष्टीसुख देते तसे बाकीचे नैवेद्य देत नाहीत अशी ही मंगलकारक, पारंपरिक पुरण पोळी आहे. चला तर कशी करायची पाहूयात .... Mangal Shah -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#post1#गौरी गणपतीसाठी#पुरणपोळीआपल्याकडे बऱ्याच सणांना पुरणपोळी चा नैवेद्य दाखवला जातो.गोड पुरणपोळी सोबत तिखट आणि झणझणीत कटाची आमटी व गोड खीर असे छान लागते.खास करून गौरी-गणपतीसाठी आरती साठी पुरणाचे दिवे करतात. Bharti R Sonawane -
पुरणपोळी महानैवेद्य (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Surekha vedpathak -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मी ह्या वर्षी गौरी साठी गावी गेले नाही म्हणून घरीच त्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य देवाला दाखवला.. Mansi Patwari -
शाही पुरणपोळी (shahi puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 सण म्हटलं कि पुरणपोळी हि आलीच आणि ति न आवडणारे फार कमी जण असतील ... मी आज जरा नेहमीच्या पुराणपोळीत थोडा मावा घेतला छान झाल्यात तुम्ही करून बघाDhanashree Suki Padte
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपली महाराष्ट्रीयन पारंपारिक पुरणपोळीची रेसिपी शेअर करत आहे.काहीजण मुगडाळ वापरून सुद्धा ही पुरणपोळी बनवू शकतात.माझी आजी नेहमी म्हणायची की पुरण घातले की लगेचच त्याचे कणिक मळून ठेवावे म्हणजे कणिक छान मुरले की पुरणपोळ्या सुद्धा खूप सुंदर बनतात.तुम्हालाही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
पुरणपोळी
#पुरणपोळी ... होळी रे होळीहोळी म्हटली की साहजिकच पुरणपोळी आलीच. सगळ्यांकडे थोड्या फार फरकाने सारखीच रेसिपी असली, तरी पुरणपोळी हा पदार्थ तसा निगुतीने करायचा. मऊसूत पिठात खमंग गोड पुरण भरून हलक्या हाताने पोळी न फाटू देता लाटणे यातच कसब आहेच पण त्यांनतर ती पोळी तूप घालून खमंग भाजताना ही त्या अन्नपूर्णे चा खरा कस लागतो... आणि मग खवय्यांच्या ताटात पडते ती गोड लुसलुशीत पुरणपोळी... मग ती तुपाबरोबर खा, दुधाबरोबर खा किंवा तिखट कटा बरोबर.... ब्रम्हानंदी टाळी लागलीच समजा😋 Minal Kudu -
महाराष्ट्रीयन पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSRमहाराष्ट्राची आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! मऊसूत पुरणाने गच्च भरलेली , सोनसळी रंगाची , नाजूक किंचित जाडसर लाटलेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो! पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच ! बरेच लोक असे मानतात की, "मराठी पुरणपोळी रेसिपी"ची मूळ सुरूवात महाराष्ट्र राज्यामध्ये झाली.कदाचित " महाराष्ट्रीयन पुरण पोळी "या जगापासून अस्तित्वात आहे. महाराष्ट्र तसेच गुजरात आणि गोवा ही गोड पोळी तयार करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.चला तर मग पाहूयात खमंग साजूक तुपातील पुरणपोळी. Deepti Padiyar -
तुरीच्या डाळीची पुरणपोळी (turichya dalichi puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11पुरणपोळी आणी आप्पे रेसिपीजगौरी गणपती च्या आगमनाने प्रसान्नाता च वातावरण. वडा पुरणचा स्वयंपाक पण काही माझ्या सारखे असतिल ज्यांना पुरण तर आवडते पण हरबरा डाळीचे चालत नाही मग त्याला पर्याय काय तर तसेच तुरीच्या डाळीचे पुरण करुन त्याच्या पुरणपोळ्या. Devyani Pande -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा महाराष्ट्रात बनणारा एक गोड व महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .तसेच गणपती बरोबर गौरी आल्या की त्यांनाही पुरणपोळी लागतेच. म्हणून खास गौरींसाठी हा पुरणपोळीचा नैवेद्य. Prachi Phadke Puranik
More Recipes
टिप्पण्या