आवळा मोरावळा.. (aawla morawala recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #week11 की वर्ड- आवळा

आवळा असे बहुगुणी
समस्यांवर उपायांच्या खाणी..
करी शरीराला तो detox
रोग प्रतिकारक शक्तीचा छोटा box..
पित्त खवळता लागते भ्रांत
मोरावळा खा मग पित्त होईल शांत..
केशसंभार ठेवे काळाभोर
मजबूत मुळे करती केसगळती दूर..
डायबिटीस ला आहे रामबाण
antioxidant हा साखरेला वरदान..
त्रिफळा च्यवनप्राशात याची मात्रा
तरुण रहाल सदा वय ठेवी सतरा..
नयनांची ज्योत ठेवी तेजस्वी रस तो भारी
चालू द्या मग सोशल मिडियाची दिनरात मुशाफिरी..
मीठासवे आवळा खाता हो तुम्ही
षड्रस मिळतील guarantee देतो आम्ही..
निसर्गाने बहुमोली आवळा दिला आपल्या हाती
धन्यवाद करु अन् नित्य सेवनाने वाढवू याची महती...

चला तर मग मोरावळ्याची रेसिपी करुन अत्यंत बहुगुणी आवळ्याची महती सर्वदूर पोहचवूया...

आवळा मोरावळा.. (aawla morawala recipe in marathi)

#GA4 #week11 की वर्ड- आवळा

आवळा असे बहुगुणी
समस्यांवर उपायांच्या खाणी..
करी शरीराला तो detox
रोग प्रतिकारक शक्तीचा छोटा box..
पित्त खवळता लागते भ्रांत
मोरावळा खा मग पित्त होईल शांत..
केशसंभार ठेवे काळाभोर
मजबूत मुळे करती केसगळती दूर..
डायबिटीस ला आहे रामबाण
antioxidant हा साखरेला वरदान..
त्रिफळा च्यवनप्राशात याची मात्रा
तरुण रहाल सदा वय ठेवी सतरा..
नयनांची ज्योत ठेवी तेजस्वी रस तो भारी
चालू द्या मग सोशल मिडियाची दिनरात मुशाफिरी..
मीठासवे आवळा खाता हो तुम्ही
षड्रस मिळतील guarantee देतो आम्ही..
निसर्गाने बहुमोली आवळा दिला आपल्या हाती
धन्यवाद करु अन् नित्य सेवनाने वाढवू याची महती...

चला तर मग मोरावळ्याची रेसिपी करुन अत्यंत बहुगुणी आवळ्याची महती सर्वदूर पोहचवूया...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मिनीटे
4 जणांना
  1. 500 ग्रॅमआवळा
  2. 600 ग्रॅमसाखर
  3. 2 इंचआले किसून
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. 15-20केशराच्या काड्या
  6. चिमुटभरमीठ

कुकिंग सूचना

30-35 मिनीटे
  1. 1

    प्रथम आवळे चांगले धुऊन कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून उकडून घ्यावेत आणि थंड झाल्यावर त्यातील बिया काढून टाकाव्यात.

  2. 2

    आता एका पातेल्यात थंड झालेले आवळे, साखर, चिमूटभर मीठ,किसलेले आले घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे आणि तासभर तसेच ठेवून द्यावे.

  3. 3

    एका तासाने हे मिश्रणाचे पातेले मंद गॅसवर ठेवून मिश्रण सतत ढवळत राहावे साखर हळूहळू विरघळून त्याचे पाणी तयार होईल आता यात केशर काड्या घालून परत व्यवस्थित एकत्र करा आणि लो टू मिडीयम आचेवर मिश्रण शिजू द्यावे.

  4. 4

    आपल्याला साखरेचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे म्हणून एक तारी पाक होईपर्यंत मोरावळा गॅसवर शिजवत ठेवावा आणि सतत ढवळत राहावे.

  5. 5

    साखरेचा एकतारी पाक झाला की वेलची पावडर घालून मोरावळा परत एकदा मिक्स करावा आणि गॅस बंद करा. तयार झालेला मोरावळा पातेल्यात सात ते आठ तास ठेवा आणि गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा.

  6. 6

    असा तयार झालेला मोरावळा रोज सकाळी उठल्यावर एक चमचा खावा आणि आवळ्याचे सगळे गुणधर्म मिळवा.

  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (11)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
ताई मोरावळा खूप छान झाला

Similar Recipes