तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#cooksnap
#Shilpa kulkarni
मी शिल्पा ताईंची आमटी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी आमटी झाली होती. त्यातील आमसूल आणि गुळाची टेस्ट खूप छान लागते. खूप खूप धन्यवाद शिल्पा ताई 🙂🙏

तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)

#cooksnap
#Shilpa kulkarni
मी शिल्पा ताईंची आमटी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी आमटी झाली होती. त्यातील आमसूल आणि गुळाची टेस्ट खूप छान लागते. खूप खूप धन्यवाद शिल्पा ताई 🙂🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपतूरडाळ
  2. 1टोमॅटो
  3. 2अमसूल तुकडे
  4. 1 टीस्पूनगूळ (चवीनुसार घेणे)
  5. 2 टीस्पूनगोडा मसाला
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनहिंग
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1/2 टीस्पूनजीरे
  11. 5-6कढीपत्ता पान
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. चवीनुसारमीठ
  14. कोथिंबीर
  15. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धून कुकर मध्ये छान मऊ शिजवून घेणे. तोपर्यंत टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेणे.आता शिजलेली डाळ रवीने किंवा डावाने छान घोटून घेणे.

  2. 2

    आता गॅस वर पातेले ठेवून त्या मध्ये तेल घालावे. तेल गरम झाले कि मोहरी, जीरे, हिंग, हळद याची खमंग फोडणी करून घेणे. आता घोटून घेतलेल्या डाळी मध्ये चवीनुसार मीठ, गोडा मसाला किंवा तुमच्या रोजचामसाला, लाल तिखट, चवी ला थोडा गूळ (ऑपशनल आहे), कढीपत्ता घालून एकत्र करणे.

  3. 3

    आता फोडणी मध्ये बारीक चिरलेला टोमॅटो 2-3 मिनिट परतून घेणे.आता या मध्ये डाळ घालून घेणे. व आमटी किती पातळ आणि घट्ट हवी आहे या प्रमाणे त्या मध्ये गरम पाणी घालावे. व गॅस बारीक करून 5-7 मिनिटे आमटी उकळून घेणे. मस्त मसाल्यांचा वास यायला लागतो. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

  4. 4

    अशा प्रकारे मस्त उकळून घेतलेली गरम आमटी जेवताना सर्वेकरावी.भात आणि आमटी सोबत कैरीचे लोणचे खूप मस्त बेत जमतो. खूप छान आंबट गोड अमसूल आमटी तयार झाली होती. झटपट आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes