बीटरूट डाळ वडा (beetroot daal vada recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#SR
आपण नेहमीच डाळ वडा करतो तशीच हरबरा डाळ भिजून वडे केले आहे ,फक्त ते थोडसं हैल्दी बनवायचे म्हणून बीट चा वापर केला आहे.
सर्वाना आवडेल अशी ही रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा

बीटरूट डाळ वडा (beetroot daal vada recipe in marathi)

#SR
आपण नेहमीच डाळ वडा करतो तशीच हरबरा डाळ भिजून वडे केले आहे ,फक्त ते थोडसं हैल्दी बनवायचे म्हणून बीट चा वापर केला आहे.
सर्वाना आवडेल अशी ही रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
12 ते 15 वडे
  1. 150 ग्रामहरबरा डाळ
  2. 200 ग्रामबीटरूट (2 नग)
  3. 1कांदा
  4. 4-5 हिरव्या मिरच्या
  5. 1 इंचआले
  6. 1 टेबलस्पूनमीठ
  7. 1 वाटीकोथिंबीर
  8. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    हरबरा डाळ कमीत कमी दोन तास भिजवावी. डाळ भिजल्यानंतर पूर्ण पाणी नितरवून घ्यावे व बीटरूट चे साल काढून तुकडे करून घ्यावे व मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे व बाजूला ठेवावे

  2. 2

    आता मिक्सरमध्ये भिजवलेली हरबरा डाळ,आलं,हिरवी मिरची व कोथिंबीर एकत्र वाटून घ्यावी व बिटाच्या वाट्नामध्ये मिक्स करावी

  3. 3

    तयार डाळीच्या मिश्रणात एक कांदा चिरून घालावा व मीठ घालून मिश्रण परत एकजीव करावे. तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे हातावर थापून वडे तयार करून घ्यावे

  4. 4

    एका कढईत तेल गरम करून त्यात तयार वडे दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यावे. गरमागरम वडे दही व चटणी बरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes