आंबोळी (amboli recipe in marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#KS1 - Konkan special

आंबोळी (amboli recipe in marathi)

#KS1 - Konkan special

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीतांदूळ
  2. 3/4 वाटीउडीद डाळ
  3. 1मेथी दाणे
  4. 1/2पोहे
  5. 2 टीस्पूनमीठ चवी प्रमाणे
  6. 1/4 वाटीतेल
  7. 5 वाटीपाणी अंदाजे घावे

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ उडीद डाळ पाणी घालून स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यानंतर पाणी घालून भिजत ठेवावे ६-७ तास. भिजून झाल्यानंतर सर्वप्रथम तांदूळ, मेथी दाणे आणि पोहे मिक्सर मध्ये घालून कोमट पाणी घालावे आणि बारीक करून घ्यावे. पाणी अंदाजे घाला पीठ जास्ती पातळ करायचे नाही. त्याचप्रमाणे उडीद डाळ बारीक करून घ्यावे.

  2. 2

    आता तांदूळ आणि उडदाची डाळ एकत्र मिक्स करून घ्यावे आणि एका डब्यात किंवा पातेल्यात रात्रभर ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पिठ चांगले फुगून येते. आता गॅसवर तवा ठेवून गरम करावा. 1 टीस्पून तेल त्यावर पसरून घालावे आणि मग हे मिश्रण डावाने पसरून थोडे जाडसर घालावे आणि शिजू द्यावे. मी इथे दोन तवे वापरले एक मोठा आणि छोटा.

  3. 3

    आता दुसऱ्या बाजूने पलटी करून शिजवून घ्यावे. आता आंबोळी तयार झाली. गरम गरम चटणी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

Similar Recipes