फोडणीचे वरण ३ (phodniche varan recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#dr
ह्या वरणाला तूप, जीरे,लसूण, मिरचीची फोडणी दिली आहे डाळ तूरीचीच वापरली आहे पण ह्याच फोडणीसाठी मुगाची डाळ पण एकदम अप्रतिम लागते.

फोडणीचे वरण ३ (phodniche varan recipe in marathi)

#dr
ह्या वरणाला तूप, जीरे,लसूण, मिरचीची फोडणी दिली आहे डाळ तूरीचीच वापरली आहे पण ह्याच फोडणीसाठी मुगाची डाळ पण एकदम अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१२ मिनिटे
  1. 1 कपशिजवलेली तूरडाळ/ मुगडाळ
  2. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  3. 1/2 टीस्पूनजीरे
  4. १/८ टीस्पून हिंग
  5. 4-5कडीपत्ता पाने
  6. 2मिरच्या
  7. 4-5लसूण पाकळ्या
  8. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  9. 1/4 टीस्पूनमीठ
  10. 1/2-1 कपपाणी..आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

१०-१२ मिनिटे
  1. 1

    तुरीची डाळ शिजवून घेतली.कोथिंबीर मिरची चिरून घेतली लसूण ठेचून घेतला.

  2. 2

    कढईत तूप घालून ते गरम झाल्यावर जीरे घातले,नंतर हिंग कडीपत्ता आणि लसूण घालून छान लाल होऊ दिला,थोडी कोथिंबीर घालून मिक्स केले.

  3. 3

    त्यात शिजवलेली डाळ मीठ आणि १ कप पाणी घालून छान उकळले.वरून कोथिंबीर घातली.वरण जास्त पातळ करायचे नाही.थोडे घट्टसर छान लागते.

  4. 4

    तयार वरण सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes