पार्ले जी बिस्कीट - चेरी अलमंड केक (cheery almond cake recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#cpm6
#बिस्कीट केक

पार्ले जी बिस्कीट - चेरी अलमंड केक (cheery almond cake recipe in marathi)

#cpm6
#बिस्कीट केक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

55 मिनीटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 3पार्ले जी बिस्कीट पॅक (300 ग्राम)
  2. 1 कपदूध
  3. 1/2 कपपीठी साखर
  4. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  6. 1 टेबलस्पूनकोको पावडर
  7. 1/4 कपचेरी काप
  8. 1/4 कपबदाम

कुकिंग सूचना

55 मिनीटे
  1. 1

    प्रथम सगळी तयारी करून घ्यावी. आता पार्ले जी बिस्कीट मिक्सर चा भांड्यात तुकडे करून टाकावे व त्यात पिठीसाखर घालून घ्यावी. व ते बारीक करावे व त्यात बेकिंग पावडर घालून परत मिक्सर फिरवून घ्यावे. नंतर चाळणीतून चाळून घ्या म्हणजे स्पॉंजि होईल

  2. 2

    आता त्यात निम्मे दूध घालून मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे व नंतर परत त्यात दूध घालून परत फिरवून घ्यावे, नंतर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि कोको पावडर घालून मिश्रण परत एकदा फिरवून घ्यावे. बॅटर एकदम स्मूथ होईल. व त्यात थोडे बदाम व चेरी काप घालून हलक्या हाताने मिक्स करावे. आता कुकर 10 मिनिटे प्रिहिट करून घ्या (शिट्टी & गॅसकेट काढून ठेवा), कुकर मधे मीठ घाला व त्यावर एक स्टॅन्ड ठेवून घ्या.

  3. 3

    आता केक चे भांडे तेलाने ग्रीस करून त्यावर पीठ भुरभुरावे व त्या भांड्यात पीठ ओतून त्यावर चेरी आणि बदाम काप घालून नंतर टॅप करून घ्यावे भांडे. कुकर मधे भांडे ठेवून घ्यावे व 35 ते 40 मिनटं बेक करावे, केक तयार झाला आहे का आपण टूथ पीक केक मधे घालून बघा, तशीच जर क्लिअर बाहेर आली तर समजावे केक झाला. व गॅस बंद करा.

  4. 4

    आता केक चे भांड कुकर मधून बाहेर काढून घ्यावे व सूरी ने कडा मोकळ्या करा व नंतर केकला दुधाने ब्रशिंग करावे व नंतर जाळी च्या प्लेट वर ठेवून त्यावर मलमल चा रुमाल घालून केक झाकून ठेवा. व पूर्ण गार झाल्यावर सर्व्ह करा.

  5. 5

    केक तयार आहे

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes