उपमा (upma recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#wdr
आमची रविवार ची सुरुवात बऱ्याचदा पोहे किंवा उपमा खाऊन होते.आज पण उपमा केला मस्त..गरमगरम उपमा त्यावर खवलेले खोबरे, कोथिंबीर आणि मस्त वरून लिंबू पिळायचा...सोबत वाफाळलेला चहा....मस्त...

उपमा (upma recipe in marathi)

#wdr
आमची रविवार ची सुरुवात बऱ्याचदा पोहे किंवा उपमा खाऊन होते.आज पण उपमा केला मस्त..गरमगरम उपमा त्यावर खवलेले खोबरे, कोथिंबीर आणि मस्त वरून लिंबू पिळायचा...सोबत वाफाळलेला चहा....मस्त...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
३-४
  1. 1 कपजाड रवा
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  6. १/८ टीस्पून हिंग
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 4-5कडीपत्ता पाने
  9. 1/4 टीस्पूनमीठ
  10. 2 टीस्पूनसाखर..आवडीनुसार
  11. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  12. 2-3 टेबलस्पूनखवलेले खोबरे
  13. 2-3लिंबाच्या फोडी
  14. 2 कपगरम पाणी..आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    साहित्य घेतले.कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,मिरची चिरून घेतले.रवा भाजून घेतला.

  2. 2

    कढईत तेल तापवून त्यात जीरे मोहरी तडतडल्यावर त्यात कडीपत्ता पाने,हिंग घालून छान फोडणी केली.त्यात कांदा घालून छान परतले नंतर चिरलेला टोमॅटो घालून दोन मिनिटे परतले.त्यात भाजून घेतलेला रवा,मीठ,साखर घालून छान मिक्स केले.

  3. 3

    पाणी उकळून घेतले.ते हळूहळू घालून मिक्स केले.चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स केले.

  4. 4

    झाकण ठेऊन दोन तीन मिनिटे वाफेवर शिजवले.उपमा खाण्यासाठी तयार आहे.गरम उपम्याची मुद पाडून त्यावर खवलेले खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह केला.सोबत लिंबाची फोड दिली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Top Search in

Similar Recipes