आलू पालक भाजी (aloo palak bhaji recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

पटकन होणारी पौष्टिक भाजी. चवीलाही अप्रतिम 😋

आलू पालक भाजी (aloo palak bhaji recipe in marathi)

पटकन होणारी पौष्टिक भाजी. चवीलाही अप्रतिम 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 1जुडी पालक
  2. 1मध्यम उकडलेला बटाटा
  3. 1मध्यम कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 1हिरवी मिरची (option)
  6. 4-5लसूण पाकळ्या
  7. 1/2 टेबलस्पूनजीरे
  8. 1/2 टेबलस्पूनतिखट
  9. 1/4 टेबलस्पूनधणे-जीरे पूड
  10. 1/2 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  11. 1/4 टेबलस्पूनहळद
  12. कोथिंबीर
  13. 2-3 टेबलस्पूनतेल
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. पालक, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर,मिरची बटाटा,लसूण चिरुन घ्यावे.

  2. 2

    पॅनमध्ये तेल टाकावे. गरम झाल्यावर जीरे टाका. तडतडले की मिरची,लसूण परतून घ्यावा. त्यात कांदा परतून घ्यावा.

  3. 3

    कांदा गुलाबी रंगावर परतल्यावर टोमॅटो शिजेपर्यंत परतणे. त्यात मसाले टाकून हलवून घ्यावे. पालक टाकून एकत्र परतावे. बटाट्याच्या फोडी टाकून भाजी मोठ्या गॅसवर परतून घ्यावी.

  4. 4

    पटकन होणारी पौष्टिक भाजी पोळी, भाकरी सोबत खायला द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

Similar Recipes