खमंग खुसखुशीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge
#shr #cooksnap_challenge
श्रावण महिना हा वेगवेगळ्या सणांचा महिना.. ऊन-पावसाचा महिना.. या दिवसात चहुकडे हिरव्यागार पानाफुलांनी बहरलेला निसर्ग पहायला मिळतो..त्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून मन आणि डोळे तृप्त होतात..म्हणूनच दूर्वा,तुळस,आघाडा,बेल, वेगवेगळ्या पत्री , सोनटक्का,पिवळा चाफा,मोगरा,चमेली,शेवंती,गुलाब ही फुले ..ही निसर्गाने आपल्यावर केलेली उधळण आपण देवाला वाहून निसर्गाचे देणे निसर्गाला अर्पण करुन कृतज्ञता व्यक्त करतो ..😊🙏 पावसाळ्यात पिकणाऱ्या हिरव्यागार भाज्यांची तर लयलूट असते.दोडका,पडवळ,घोसाळी,लाल भोपळा,भेंडी,काकडी,भाजीचे अळू,वडीचे अळू ..या भाज्यांचे नैवेद्य मग आपसूकच होतात..तर अशा या सणांच्या दिवसात बाहेरचे आल्हाददायक वातावरण तसेच घरामधील मंगलमय वातावरण यामुळे मन प्रसन्न प्रफुल्लित होत असते आणि म्हणूनच हे सणवार आपण उत्साहाने साजरे करतो..असाच एक घरोघरी साजरा केला जाणारा सण म्हणजे श्रावणी शुक्रवारची श्री जिवती देवीची पूजा..🙏🌹🙏..आपल्या मुलाबाळांना आयुरारोग्य,सुख समाधान,यश प्राप्त व्हावे म्हणून महिला जिवतीची पूजा करतात..आघाड्याची माळ, विविध फुले वाहतात..पुरणावरणाचा,चणेगुळ,दुधाचा नैवेद्य दाखवतात,सवाष्णीला जेवायला बोलावून तिचे मनोभावे पूजन करुन खणा नारळाचे ओटी भरुन आपल्या मुलाबाळांसाठी उदंड आयुष्य मागतात..संध्याकाळी पुरणाची दिवे करून जिवतीला ,तिच्या बाळांना,आपल्या मुलाबाळांना औक्षण करतात..जिवतीची कहाणी वाचतात.श्री जिवतीला दाखवण्यात येणार्या नैवेद्यातील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे अळूवडी..ही नैवेद्याच्या पानात हवीच..तर मी आज@ArtiTareयांचीरेसिपीcooksnapकेलीआहे.Thank you आरती.. खूप मस्तखमंग झाली अळूवडी😊🌹❤️ खूप आवडली मला..🌹

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनीटे
4जणांना
  1. 10अळू ची पाने
  2. 8 टेबलस्पूनबेसन
  3. 1 टीस्पूनधणे जीरे पूड
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 2 टीस्पूनतेल
  8. 2 टेबलस्पूनचिंचेचा कोळ,गुळ आवश्यकतेनुसार
  9. 2 टेबलस्पूनतीळ
  10. 1 टीस्पूनतांदूळ पीठ

कुकिंग सूचना

30-40 मिनीटे
  1. 1

    प्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्या.नंतर त्याची देठ कापून घ्या. आणि पानांवर हाताने हलका दाब द्या..

  2. 2

    एका वाडग्यात बेसन पीठ तांदूळ पीठ घ्या त्यात तिखट हळद हिंग,धणेजिरे पूड घाला. तीळ, चिंचेचा कोळ आणि बारीक चिरलेला गूळ घालून दाटसर मिश्रण करा.

  3. 3

    आता हे मिश्रण अळूच्या पानाला लावावे.पान पालथे ठेवावे.मग त्यावर दुसरे पान ठेवून परत डाळीच्या पिठाचे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यावे.असं सगळ्या पानांना मिश्रण लावून घ्यावे व ही पाने घट्ट गुंडाळी करून घ्या.

  4. 4

    अळूच्या पानाची गुंडाळी एका चाळणीत ठेवून पाण्यावर वाफवून घ्यावी.जसे आपण मोदक वाफवतो तसे वाफवावे. साधारण मिडीयम आचेवर पंधरा ते वीस मिनिट ही आळूच्या पानांची गुंडाळी वाफवून घ्यावी. गार झाल्यावर याचे हव्या त्या आकारात तुकडे करून घ्यावेत.

  5. 5

    आता कढईत तेल तापवून घ्यावे.तेल चांगले तापलेलेअसावे. नंतर medium आचेवर या तेलात एकावेळी तीन ते चार अळूवड्या घालून खरपूस रंगावर तळून घ्याव्यात.

  6. 6

    अशाप्रकारे आपल्या खमंग रुचकर अळू वड्या जिवतीला नैवेद्य दाखवून खायला तयार..

  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Top Search in

Similar Recipes