ड्राय फ्रूट करंजी (dry fruit karanji recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#dfr
#दिवाळी फराळ चॅलेंज

ड्राय फ्रूट करंजी (dry fruit karanji recipe in marathi)

#dfr
#दिवाळी फराळ चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिट
  1. कव्हरसाठी..
  2. १ कप मैदा
  3. 1 कपबारीक रवा
  4. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  5. 2-3 टेबलस्पूनसाजूक तूप मोहना साठी
  6. मीठ चवीनुसार
  7. 1/2 कपदूध (गरजेनुसार)
  8. सारणासाठी
  9. १/२ कप सुक्या खोबऱ्याचा कीस
  10. 2 टेबलस्पूनकाजू
  11. 2 टेबलस्पुनबदाम
  12. 2 टेबलस्पूनआक्रोड
  13. 2 टेबलस्पूनपीस्ते
  14. 1 टीस्पूनवेलची जायफळ पूड
  15. 1/4 कपमेजरींग कप
  16. 2 टेबलस्पूनबेदाणे
  17. 7-8खजूर

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    प्रथम कव्हर साठी मैदा रवा चालून घेतले मग त्यात कॉर्नफ्लोअर, मीठ, मिक्स केले.

  2. 2

    मग साजूक तूप गरम करून मैद्याच्या मिश्रणात घातले व हाताने चांगले चोळून घेतले. तुपाचे मोहन मैद्याच्या मिश्रणाची मुठ वळेपर्यंत घालावे. मग थोडे थोडे दूध घालून घट्ट गोळा मळून घ्यावा. फूड प्रोसेसर मधून काढून घ्यावा किंवा कुटून घ्यावा. व अर्धा तास झाकून ठेवावा.

  3. 3

    आता सारण तयार करण्यासाठी काजू, बदाम, अक्रोड, पीस्ते हे बारीक कट करून घेतले. खोबर्‍याचा किस थोडासा भाजून बारीक चूरून घेतला. खजूर बारीक करून घेतला.

  4. 4

    वरील सर्व मिश्रण मिक्स करून त्यात वेलची जायफळ पुड मिक्स करून सारण तयार केले.

  5. 5

    आता कव्हर च्या गोळ्यातील लहान गोळा घेऊन त्याची पारी लाटून त्यात सारण भरून करंजीचा आकार दिला मग सर्व करंज्या तयार झाल्यावर गॅस वरील तुपात मध्यम आचेवर सर्वच छान तळून घेतल्या. या करंज्या एकदम खुसखुशीत होतात व ड्रायफ्रूट्स मुळे हेल्दी पण होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes