महाराष्ट्रीयन पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#HSR

महाराष्ट्राची आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! मऊसूत  पुरणाने  गच्च भरलेली , सोनसळी रंगाची , नाजूक किंचित जाडसर लाटलेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील  कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो! पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच ! 
बरेच लोक असे मानतात की, "मराठी पुरणपोळी रेसिपी"
ची मूळ सुरूवात महाराष्ट्र राज्यामध्ये झाली.
कदाचित " महाराष्ट्रीयन पुरण पोळी "या जगापासून अस्तित्वात आहे. महाराष्ट्र तसेच गुजरात आणि गोवा ही गोड पोळी तयार करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
चला तर मग पाहूयात खमंग साजूक तुपातील पुरणपोळी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ ते ५ जणांसाठी
  1. 1 कपचणाडाळ
  2. 1 कपकिसलेला गूळ
  3. 1 कपमैदा
  4. 1/2 कपगव्हाचे पिठ
  5. 7 ते ८ टेबलस्पून तूप
  6. 1 टिस्पून वेलचीपूड, जायफळ पूड
  7. कोरडे तांदुळाचे पीठ
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल गरजेनुसार
  10. 1/2 टिस्पून हळद

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावे. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.

  2. 2

    डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावे. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात १ चमचा वेलचीपूड,जायफळ पूड,चिमूटभर मीठ घालावे.

  3. 3

    मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे.

  4. 4

    मैदा आणि कणिक,मीठ,हळद मिक्स करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे. आणि सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पिठ २ तास मुरू द्यावे.

  5. 5

    पुरणाचे दिड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.

  6. 6

    पोळपाटावर थोडी तांदुळाची पिठी घेउन हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.
    साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी. या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दूधाबरोबर छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes