रेड सॉस पास्ता

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#कीडस
लहान मुलांची एनीटाईम फेवरेट डिश म्हणजे पास्ता

रेड सॉस पास्ता

#कीडस
लहान मुलांची एनीटाईम फेवरेट डिश म्हणजे पास्ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२-३
  1. २ कप पास्ता
  2. टोमॅटो
  3. १/४ कप टोमॅटो सॉस
  4. २/३ टेबल स्पून तेल
  5. १/४ टीस्पून काळमिरी पावडर
  6. १/४ टीस्पून ओरिगनो पावडर
  7. १/४ टीस्पून बासील (तुळसी) पावडर
  8. १/४ टीस्पून चिल्लिफ्लेक्स पावडर
  9. सिमला मिरची कापलेली (रंगीत सिमला मिरची घेऊ शकता)
  10. ३/४ लसूण आणि आल कुटून घेणे
  11. मीठ चवीप्रमाणे
  12. किसलेले चीझ (सजावटी साठी)

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व घटकांची प्रमाणा नुसार तयारी करून घेणे.

  2. 2

    ५/६ कप पाण्यात २/३ चमचे तेल व १/२ छोटा चमचा मीठ घालून, पाणी उकळावे. मग त्यात पास्ता घालू. शिजवुन घ्यावा.

  3. 3

    पास्ता शिजला की दुसऱ्या भांड्यात काढून त्यावर थंड पाणी घालावे.

  4. 4

    दुसऱ्या गॅस वर टोमॅटो शिजवून घ्यावेत.

  5. 5

    टोमॅटो शिजले आणि गार झाले की त्याची मिक्सर मध्ये चांगली पेस्ट करून घ्यावी.

  6. 6

    एका पॅन मध्ये १ चमचा तेल घालून ते चांगलं गरम झालं की त्यात कुटलेली लसूण आणि आल घालून परतून घ्यावं. मग त्यात चिरलेली सिमला मिरची घालून चांगलं परतावे. मग त्यात मिक्सर मध्ये केलेली टोमॅटोची पेस्ट घालावी. मग त्यात काळमिरी पावडर, मीठ, चिलिफ्लेक्स पावडर, बसील पावडर व ओरिगनो पावडर घालून सॉस चांगला ५ मिनिटे शिजवून घ्यावा. मग त्यात टोमॅटो सॉस घालून परत ५ मिनिटे मध्य आचेवर शिजवावा.

  7. 7

    रेड सॉस शिजला की त्यात शिजवलेला पास्ता घालावा व एकत्र करून १/२ मिनिटे परत शिजवावा.

  8. 8

    तयार पास्ता एका बाउल मध्ये काढून, त्यात वरून किसलेले चीझ घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या

Similar Recipes