तीन दाल लसुनी तडका

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

तीन दाल लसुनी तडका

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रॅमतुरीची डाळ
  2. 50 ग्रॅममुगाची डाळ
  3. 20 ग्रॅममसूर डाळ
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1 टीस्पूनजिरे
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  9. 1/2 इंचआलं ठेचलेला
  10. 15लसणाच्या पाकळ्या
  11. चवीनुसारमीठ
  12. पाणी
  13. कोथिंबीर बारीक चिरलेली
  14. 2सुक्या मिरच्या

कुकिंग सूचना

  1. 1

    चला तर मैत्रिणींनो बनवूया तीन दाल लसुनी तडका. सर्वप्रथम आपण घेतलेल्या तिन्ही डाळी स्वच्छ पाण्यात न दोनदा धुऊन एक तासभर पाण्यात भिजत ठेवाव्या.त्यानंतर कुकरला आपण नेहमीप्रमाणे डाळ शिजवतो त्याच प्रमाणे चार-पाच शिट्ट्या काढून घ्याव्या. मिया डाळीला तुपाची फोडणी दिली आहे त्याने एक वेगळाच स्वाद या डाळीला येतो.

  2. 2

    फोडणीसाठी लसुन दोन प्रकारे कापावा प्रथम फोडणीसाठी बारीक कापलेला लसुन वापरावा वरून तडका देण्यासाठी लांब कापलेला लसूण वापरावा. पातेल्यामध्ये घी/तूप घेऊन त्यामध्ये मोहरी जिरे हिंग बारीक कापलेला लसुन बारीक घेतलेलं आलो दोन हिरव्या मिरच्या व लाल तिखट हे सगळे फोडणी मध्ये टाकावे.

  3. 3

    फोडणीचा खमंग वास आला की त्यामध्ये शिजवलेली डाळ ओतावी. अवश्य असेल तितकेच पाणी टाकून मीठ टाकून डाळीला छान उकळी येऊ द्यावी कळाली की त्यामध्ये कोथिंबीर टाकावी. कोथिंबीर टाकल्यावर डाळीला एक मिनिट परत उकळी येऊन द्यावी.

  4. 4

    दुसरीकडे फोडणी पात्रा मध्ये परत एक चमचा त तूप घ्यावे त्यामध्ये लांब कापलेला लसुन व लाल मिरची ची फोडणी द्यावी लसुण थोडा सा करपून द्यावा आणि मग ही फोडणी डाळीवर ओतावी. गरमागरम डाळ पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes