कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#photography
#photographyhomeworkकारल्याची भाजी..
कारल म्हंटले की घरातील सर्वानाच भुक लागत नाही त्यादिवशी... पण नाही ह...
माझ्याकडे असे नाही... कारल्याची भाजी म्हंटली की अगदी मनापासून सर्वांना आवडते..
माझ्या भाजीला कडवट पणा बिलकुल नसतो. त्यामुळे मुलीना डब्यात जेव्हा .. मी ही भाजी देते तेव्हा डबा तर चाटून पुसून साफ केलेला असतो. किंबहुना मला हि भाजी जास्त द्यावी लागते... त्याच्या साठी आणि त्यांच्या मैत्रीणीकरीता देखील....यात मी टमाटर जास्त घालते. त्यामुळे भाजी छान होते. कडवट होत नाही.
चला बघूया कशी करायची *कारल्याची भाजी *

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
चार व्यक्ती साठी
  1. २५० ग्राम कारले चिरून घेतलेले
  2. २/३ टमाटर
  3. 2कांदे
  4. थोडीशीकोथिंबीर
  5. ७/८कढीपत्ता ची पाने
  6. 1/2 टिस्पुनहळद, हिंग, धनेपावडर, जिरापावडर, गरम मसाला, मोहरी
  7. 1 टेबलस्पूनतिखट
  8. चवीनुसारमीठ
  9. ५/६ लसूण पाकळ्या

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    कारली चिरुन घ्या. व त्याला एक टेबलस्पून मीठ लावून दहा मिनिटे ठेवा. नंतर दहा मिनिटांनी दोन पाण्यानी धुवून घ्या.

  2. 2

    एक पॅन घेऊन गॅस वर ठेवा. त्यामध्ये तेल घालून गरम होऊ द्या.. आता यामध्ये सर्व प्रथम कारली घाला.. दोन मिनिटे होऊ द्या. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घाला. व चांगले गोल्डन कलर होईस्तोवर परतून घ्या.

  3. 3

    आता यामध्ये लसूण पेस्ट व कढीपत्ता घाला. एक मिनिट होऊ द्या. नंतर त्यामध्ये क्रमाक्रमाने तिखट, हळद, हिंग, धनेपावडर, जिरापावडर घाला. मीठ बिलकुल कमी घाला. कारण आपण आधीच कारल्याला मीठ लावून ठेवले होते. दोन मिनिटे होऊ द्या.

  4. 4

    गरम मसाला आणि कोथिंबीर घाला. आपली कारल्याची भाजी तयार. गरम गरम भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करा..
    💃🏻💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes