शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

#रेसिपीबुक #week4
शेगाव माझे सासर. 2 वर्षा पूर्वी जाण्याचा योग आला. खूप मज्जा केली होती आम्ही.गजानन महाराजांचे मंदिर.तेथील स्वछता आणि हो आनंदसागर तर बघण्यासारखे आहेत तिथे. आणि हा तिथे मिळणारी कचोरी अहाहा!
आज तीच बनवण्याचा प्रयत्न केला आहेत मी पण थोडेसे बदल करून हा

शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4
शेगाव माझे सासर. 2 वर्षा पूर्वी जाण्याचा योग आला. खूप मज्जा केली होती आम्ही.गजानन महाराजांचे मंदिर.तेथील स्वछता आणि हो आनंदसागर तर बघण्यासारखे आहेत तिथे. आणि हा तिथे मिळणारी कचोरी अहाहा!
आज तीच बनवण्याचा प्रयत्न केला आहेत मी पण थोडेसे बदल करून हा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमूग डाळ
  2. 8 टेबलस्पूनबेसन
  3. 1 टीस्पूनतिखट
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनधने पावडर
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 2 टीस्पूनकसुरी मेथी
  8. 2 टेबलस्पूनआमचूर
  9. 2 टेबलस्पूनपिठीसाखर
  10. 2 टेबलस्पूनधने
  11. 2 टेबलस्पूनबडीशेप
  12. 2 टीस्पूनआले किसून
  13. 2 टीस्पूनजिरे
  14. 1/4 टीस्पूनहिंग
  15. 2 कपमैदा
  16. 2 टीस्पूनओवा
  17. चवीनुसारमीठ
  18. तेल मोहनसाठी
  19. तेल तळण्यासाठी
  20. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    डाळ धुवून 2 तास भिजत घाला. मग ती मिक्सर मध्ये जाडी भरडी वाटून घ्या

  2. 2

    एका पॅन मध्ये 4 टेबलस्पून तेल घाला. मग त्यात जिरे घाला त्या नंतर त्यात धने आणि बडीशेप घाला व चांगले भाऊंना घ्या मग त्यात बेसन घालून मंद गॅस वर 7 मिनिटे भाजा

  3. 3

    आता त्यात लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, हळद, घालून चांगले भाजले कि मूग डाळ भरड घाला व भाजून घ्या. मिश्रण पूर्ण ड्राय झाले कि त्याचे थोडे पाणी घालून हिंग घाला. कसुरी मेथी घाला मग त्यात आमचूर पावडर,साखर, मीठ घालवून चांगले हलवून घ्या झाले सारण तयार

  4. 4

    मैदा एका ताटात घेऊन. त्यात मीठ आणि ओवा घाला. मग त्यात गरम तेल घाला. आणि पीठ चमच्याने हलवून हाताने दाबून गोळा होता का बघा आणि मग पीठ घट्ट मळून घ्या व 15 मिनिटे बाजूला ठेवा.

  5. 5

    आता पीठचे गोळे करून त्यात वरील सारण भरून मंद आचेवर कचोरी तळून घ्या. आणि गरम गरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

Similar Recipes