रताळ्याची स्वादिष्ट जिलबी (ratalyachi jalebi recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week15
जिलबी हे खूप लोकप्रिय पक्वान्न आहे. पारंपरिक जिलबी मैद्याची करतात. पण आणखी बऱ्याच प्रकारे जिलबी केली जाते. माव्याची बुऱ्हाणपुरी जिलबी अतिशय स्वादिष्ट लागते. पण ती जिलबी करायला जरा कठीण आहे. त्या चवीच्या जवळपास जाणारी ही रताळ्याची जिलबी करायला सोपी आहे आणि पटकन होते. शिजवलेल्या रताळ्यात कॉर्न फ्लोअर आणि दुधाची पावडर घालून मी ही जिलबी केली. खूप स्वादिष्ट झाली जिलबी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपउकडून कुस्करलेली रताळी
  2. 2 टेबलस्पूनदुधाची पावडर
  3. 2 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च)
  4. चवीनुसार मीठ
  5. १ टीस्पूनदूध जरूर असल्यास
  6. 1/2 टीस्पूनखायचा सोडा
  7. १-२वेलची
  8. 1/2 टीस्पूनलिंबाचा रस
  9. 1 कपसाखर
  10. 3/4 कपपाणी
  11. 1 कपतूप / रिफाईंड तेल जिलबी तळण्यासाठी

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    रताळी धुवून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.

  2. 2

    गार झाल्यावर रताळी सोलून किसून घ्या.

  3. 3

    रताळ्याच्या किसात कॉर्न फ्लोअर, दुधाची पावडर, मीठ घालून नीट मळून घ्या. पीठ जास्त घट्ट असेल तर थोडं दूध घालून मळा. खायचा सोडा पिठात घालून पीठ एकजीव करा.

  4. 4

    एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर आणि पाणी घालून मंद आचेवर उकळून घ्या. पाक थोडा चिकट व्हायला हवा. पाकात लिंबाचा रस, वेलची घाला आणि गॅस बंद करा. तयार पिठाचे छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे करा. हाताने लांब लड वळून घ्या. आणि लड गोल फिरवून जिलबीचा आकार द्या.

  5. 5

    तयार जिलब्या तूप / तेलात तळून टिश्यू पेपर वर काढून नंतर साखरेच्या पाकात घाला. जिलब्या पाकात घालून पाक ४-५ मिनिटं मंद आचेवर उकळू द्या. जिलब्यांमध्ये पाक मुरला की जिलब्या काढून घ्या.

  6. 6

    अशा प्रकारे जिलब्या करून पाकात घालून घ्या.रताळ्याच्या स्वादिष्ट जिलब्या गरमगरम खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

Similar Recipes