क्रिस्पी जलेबी (jalebi recipe in marathi)

Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
इंडिया

#रेसिपीबुक #week15
#जिलेबी
क्रिस्पी तुपातील जलेबी
मी नागपूर ला राहत असतांना प्रतापनगर इथे खूपच छान आणि क्रिस्पी तुपात तळलेली जिलेबी अगदी गरमागरम मिळायची. खूपच टेस्टी अशी ती जिलबी करण्याचा योग आज या थिम मुले आलाय. माझ्या नागपूर च्या सर्व मैत्रिणींनी बहुतांश या जलेबी चा आस्वाद घेतला असावा. तुम्ही एकदा तरी हि जिलेबी नक्की करा.

क्रिस्पी जलेबी (jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15
#जिलेबी
क्रिस्पी तुपातील जलेबी
मी नागपूर ला राहत असतांना प्रतापनगर इथे खूपच छान आणि क्रिस्पी तुपात तळलेली जिलेबी अगदी गरमागरम मिळायची. खूपच टेस्टी अशी ती जिलबी करण्याचा योग आज या थिम मुले आलाय. माझ्या नागपूर च्या सर्व मैत्रिणींनी बहुतांश या जलेबी चा आस्वाद घेतला असावा. तुम्ही एकदा तरी हि जिलेबी नक्की करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४-५
  1. 1/2 कपमैदा
  2. 2 टीस्पूनरवा
  3. 1/4 कपदही
  4. 1 टीस्पूनव्हिनेगर (लिंबाचा रस)
  5. 1/2 कपपाणी (लागेल तसं)
  6. 1/4 टीस्पूनइनो
  7. 1/4 टीस्पूनहळद (
  8. तळण्यासाठी तूप
  9. 1/2 कपसाखर
  10. 1/2 कपपाणी
  11. 1 लिंब चा तुकडा
  12. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  13. १०-१२केसर चे धागे
  14. 1/2 कपरबडी सर्विंग साठी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी पाक करत ठेवायचे त्याकरिता एका पॅन मध्ये साखर आणि पाणी घालून मिक्स करावे. साखर विरघळी कि त्यात वेलची पूड आणि केशर घालावा. आणि लिंबा ची एक फोड पण घालावी जेणेकरून क्रिस्टलिझेशन होत नाही.

  2. 2

    मग एका बाउल मध्ये मैदा आणि रवा, त्यात दही घालून छान फेटावे. नंतर त्यात व्हिनेगर घालून मिक्स करावे, त्यात लागेल तितके पाणी घालावे आणि इनो आणि हळद घालून ५-६ मिनिटे छान फेटावे. आणि १० मिनिटे झाकून ठेवायचे.

  3. 3

    नंतर तूप तापल्यास गॅस ची फ्लेम लो मध्यम करून गोल फिरवत जलेबी करावी आणि दोन्ही बाजूने छान भाजून घ्यावी.

  4. 4

    आता गरम जलेबी कोमटसर पाकात टाकून अगदी १-२ मिनिटे ठेवावी आणि काढून घेणे (मी इथे खूपच बारीक आणि क्रिस्पी जिलेबी केलीय तुम्ही थोडी जाड करू शकता).

  5. 5

    नंतर क्रिस्पी जिलेबी रबडी सोबत सर्वे करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
रोजी
इंडिया

टिप्पण्या (2)

Similar Recipes