काश्मिरी यखनी पुलाव विथ  चिकन (kashmiri yakhni pulao with chicken recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#उत्तर
यखनी ही मुळची आशियाई पाककृती, इथुन ती बाल्टिक उपखंड, मध्यपूर्व, दक्षिण आशिया पासून रशिया पर्यंत पोहोचली. पाककृतीचा इतिहास पाहताना आत्ताचा देशांनी विभागलेला नकाशा पहायचा नसतो. पहायचा असतो जगाच्या नकाशावरचा तिचा प्रवास. आताचा उत्तर भारत आणि पाकिस्तान या प्रदेशातील ही एक खुपच खास डिश. काश्मीर मध्ये यखनी (चिकन किंवा मटण) पदार्थांमधील उत्सवमूर्ती असते. ताटात वाढल्यावर ही पाककृती काहीशी बिर्याणी सारखी दिसत असली तरी ही बिर्याणी नाही, हा यखणी पुलाव आहे. या पाककृतीला तीची स्पेशल चव मिळते ती तिच्या बनविण्यच्या खास पद्धतीमुळे.
यखनी बनविण्यासाठी शॉर्टकट नाही, त्याचा बेत सर्व तामझामासहच आखावा लागतो.

यखनी पुलाव बनविताना सर्वात महत्वाची आहे ती यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांची चव चिकन आणि भात यात पुरेपूर आणि एकसमान उतरणे. रेसिपी मधे वापरलेले चिकन, भात हे घटक मुख्य अंग असले तरी या वापरले जाणारे मसाले या रेसिपीचा आत्मा असतात. त्याचे घटक जर योग्य प्रमाणात जुळून आले तर रेसिपी डायरेक्ट मनाला भिडते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ ते ५० मिनिटे
४ जणांसाठी
  1. यखनी बनविण्यासाठी
  2. ५०० ग्रॅम चिकन
  3. 1 टीस्पूनकाळीमिरी
  4. 1 टीस्पूनलवंग
  5. २ + १/२ इंच दालचिनीचा तुकडा
  6. 1तमालपत्र
  7. 1 पिंचजायफळ पूड
  8. 1 टीस्पूनधणे
  9. 1बडी इलायची
  10. 3-4हिरव्या वेलच्या
  11. 1चक्रफुल
  12. 1 लहानकांदा
  13. 2 इंचआले
  14. 5-6लसूण पाकळ्या
  15. 1 (1/2 टीस्पून)मीठ
  16. 5 कपपाणी
  17. पुलाव बनविण्यासाठी
  18. 2 कपबासमती तांदूळ
  19. 1कांदा (उभा चिरलेला)
  20. 1टोमॅटो (बारीक चिरलेला)
  21. 1 टीस्पूनजीरे
  22. 1/2 टीस्पूनहळद
  23. 1 (1/2 टेबलस्पून)आले लसूण पेस्ट
  24. 1 (1/2 टीस्पून)लाल मिरची पूड
  25. 1 टीस्पूनधणे पूड
  26. 1 (1/2 टीस्पून)बडीशेप पूड
  27. 1 (1/2 टीस्पून)गरम मसाला
  28. १/ २ कप दही
  29. पुदिना - बारीक चिरलेला (ऐच्छिक)
  30. 1 (1/2 टेबलस्पून)तेल
  31. 2 टेबलस्पूनतूप
  32. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

४५ ते ५० मिनिटे
  1. 1

    प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे बनविण्यासाठी सगळे साहित्य घ्यावे.
    आधी तांदूळ स्वच्छ धुवून साधारणपणे अर्धा तास भिजवून ठेवावा.
    तोपर्यंत यखनी बनवून घ्यावी. एका टोपात पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ घालावे. आता एका स्वच्छ कपड्यात दिलेले सगळे साहित्य व्यवस्थित बांधून घ्यावे.

  2. 2

    बांधलेल्या कपड्याची पोटली व चिकन त्या पाण्यात घालावे. त्यावर झाकण ठेवून १५ मिनिटे चांगले उकळवून घ्यावे.आता बांधलेली पोटली काढून घ्यावी. चिकन वेगळे काढून घ्यावे. आणि यखनी वेगळी ठेवावी. आपली यखनी तयार आहे.

  3. 3

    पुलाव बनवताना एका मोठ्या कढईमध्ये तेल व तूप घ्यावे. गरम झाल्यावर प्रथम त्यात कांदा छान तळून घ्यावा. तळलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा बाजूला काढून ठेवावा.

  4. 4

    आता त्या तेलात जीरे घालावे. जीरे तडतडले की त्यात आले लसूण पेस्ट घालावी. नीट परतवून घावे. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. एक मिनिटभर परतावे. त्यात हळद, लाल मिरची पूड, धणे पूड, गरम मसाला व मीठ घालून व्यवस्थित परतवून घ्यावे.

  5. 5

    टोमॅटो एकदम मऊ शिजल्यानंतर त्यात दही व बडीशेप पूड घालून नीट मिक्स करावे. त्यात चिकन घालून मिक्स करावे. त्यात भिजलेले तांदूळ घालून अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे.

  6. 6

    आता त्यात तयार यखनी घालावी.
    त्यावर झाकण न लावता ५ मिनिटे शिजवून घ्यावे. भात साधारण शिजवून घ्यावा.

  7. 7

    भात साधारण शिजल्यानंतर त्यात तळलेला कांदा, तूप व पुदिना घालावा. त्यावर झाकण ठेवावे व ते झाकण पीठाने सील करून घ्यावे आणि मंद आचेवर १० मिनिटे शिजवावे.

  8. 8

    आपला काश्मिरी यखनी पुलाव विथ चिकन तय्यार!!! रायत्याबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या

Similar Recipes