रवा ढोकळा (rava dhokla Recipe in Marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#स्नॅक्स
#रवाढोकळा
#6
अचानक पाहुणे घरी आले किंवा मुलांना भूक लागल्यावर अगदी आयत्या वेळी काय खायला करायचे हा प्रष्न सोडवणारा पदार्थ म्हणजे ईन्सटंट रवा ढोकळा....झटपट होणारा,घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा रवा ढोकळा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे.

रवा ढोकळा (rava dhokla Recipe in Marathi)

#स्नॅक्स
#रवाढोकळा
#6
अचानक पाहुणे घरी आले किंवा मुलांना भूक लागल्यावर अगदी आयत्या वेळी काय खायला करायचे हा प्रष्न सोडवणारा पदार्थ म्हणजे ईन्सटंट रवा ढोकळा....झटपट होणारा,घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा रवा ढोकळा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 250gram रवा
  2. 1 टीस्पूनबेसन
  3. 1 कपआंबट ताक किंवा दही
  4. 2 चमचेआले मिरची पेस्ट
  5. 1 चमचाजीरे
  6. 1 चमचामोहरी
  7. 1 चमचापांढरे तीळ
  8. 1/2 चमचाईनो
  9. 1/2 चमचाबेकींग सोडा
  10. मीठ
  11. कोथिंबीर
  12. 1 वाटीबारीक शेव
  13. तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम रवा,बेसन,व दही घेउन एकत्र करुन व आवश्यक तेवढे पाणी घालुन15 मिनिट ठेवा.नंतर छान फेटा.मिश्रण मिडियम ठेवा.

  2. 2

    आता यात थोडे जीरे,आले मिरची पेस्ट,चविनुसार मीठ,घालुन छान फेटा.मग बेकींग सोडा व शे़वटी ईनो घालुन फेटा.खुप फेटले कि ढोकळा हलका आणी स्पंजी होतो.

  3. 3

    आता एका ताटलीला तेलाने ग्रिसिंग करुन घ्या.व त्यात हे मिश्रण ओता.व ताटली steamer मधे ठेवुन 15 ते 20 मिनिट वाफवा.

  4. 4

    आता 15 मीनीट नंतर ढोकळा वाफवुन तयार आहे.छान स्पंज झाला आहे.

  5. 5

    आता यावर घालायचा तडका करा.एका कढईत तेल घेऊन गरम करुन जीरे,मोहरी,पांढरे तीळ,हिरवी मीरचीचे तुकडे घाला.छान तडतडु द्या.

  6. 6

    आता ढोकळ्याचे पिसेस करुन हा तडका वरून घाला.

  7. 7

    सजावटीसाठी शेव कोथिंबीर घाला.थोडी मिरची पुड भूरकवा.

  8. 8

    आता प्लेटटिंग करून गरम गरम रवा ढोकळा सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes