मुंबईचा फेमस चटपटीत तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

तवा पुलाव हे मुंबईचे फेमस स्ट्रीट फूड आहे.
चावीला चटपटीत आणि खूप स्वादिष्ट असा हा पुलाव घरी अगदी कमी वेळात बनवणे खूपच सोपे आहे.
नक्की बनवून पहा.😊

मुंबईचा फेमस चटपटीत तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)

तवा पुलाव हे मुंबईचे फेमस स्ट्रीट फूड आहे.
चावीला चटपटीत आणि खूप स्वादिष्ट असा हा पुलाव घरी अगदी कमी वेळात बनवणे खूपच सोपे आहे.
नक्की बनवून पहा.😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 2 कपशिजलेला बासमती तांदूळ
  2. 1उकडलेला बटाटा तुकडे करून
  3. 1/2 कपमटार
  4. 1/2 कपसिमला मिरची बा. चिरलेली
  5. 1/2 कपगाजर बा. चिरलेला
  6. 1 कपकांदा थोडासा जाडसर चिरून
  7. 3मोठे टोमॅटो चिरून
  8. 3हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून
  9. 3 टेबलस्पूनबटर
  10. 1 टीस्पूनतेल
  11. 1 टीस्पूनजीरे
  12. 2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  13. 2 टीस्पूनलाल मसाला
  14. 1 टीस्पूनगरम मसाला
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. 1 टीस्पूनधने जीरे पूड
  17. 2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  18. 1 टेबलस्पूनलाल मिरची लसूण चटणी
  19. 1/2 टीस्पूनलिंबाचा रस
  20. चवीनुसारमीठ
  21. कोथिंबीर
  22. 1/2 कपपाणी

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    एका मोठ्या तव्यावर तेल आणि2 टेबलस्पून बटर टाकून घ्या. (तवा नसल्यास पॅन किंवा पातेले वापरा.)
    त्यात जीरे टाकून ते ताडतडले की मिरची आणि कांदा टाकून कांदा नरम होईपर्यंत परतवा.

  2. 2

    आता मटार, गाजर आणि सिमला मिरची टाकून छान शिजेपर्यंत परतवून घ्या. वाटल्यास थोडे पाणी टाकून 2-3 मिनिटे झाकण ठेऊन शिजवा. आता टोमॅटो टाकून नरम होईपर्यंत परतवा.

  3. 3

    पेस्ट बाकी सर्व मसाले फक्त पावभाजी मसाला 1 टीस्पून ठेऊन मागे बाकी सर्व टाकून मिक्स करा. मीठ लिंबाचा रस आणि लाल चटणी टाकून छान तेल सुटेपर्यंत परतवून त्यात बटाटे टाकून मिक्स करा.

  4. 4

    तांदूळ टाकून घ्या. वरून उरलेले बटर पावभाजी मसाला टाकून छान हलक्या हाताने परतवून घ्या.

  5. 5

    वरून कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करा😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes