पोळ्याची कर मटण रस्सा भाजी (mutton rassa bhaji recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

आजचा दिवस म्हणजे पोळ्याची कर त्यामुळे नाॕनव्हेज खाणार्यांचा स्पेशल दिवस.म्हणून मटण रस्सा बनविण्याचा बेत केला.

पोळ्याची कर मटण रस्सा भाजी (mutton rassa bhaji recipe in marathi)

आजचा दिवस म्हणजे पोळ्याची कर त्यामुळे नाॕनव्हेज खाणार्यांचा स्पेशल दिवस.म्हणून मटण रस्सा बनविण्याचा बेत केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास 15 मि.
2 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅममटण
  2. 3 टेबलस्पूनदही
  3. 1 टीस्पूनधने पावडर
  4. 2 टीस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 2हिरवी मिरची
  8. 2 टीस्पूनमीठ
  9. 1/2 टीस्पूनमटण मसाला
  10. 2-3 तुकडेतेजपान
  11. मसाला फूल
  12. 5-6काळे मिरे
  13. 2 इंचकलमी
  14. 2साधी विलायची
  15. चिमुटभरशहाजीरा
  16. 5-6काजू तुकडे
  17. 1कांदा बारीक चिरलेला
  18. 1कांदा व 1 टोमॅटो याची पेस्ट
  19. 6-7लसूण पाकळ्या सोललेल्या व 1 इंच अद्रक खलबत्यात बारीक केली
  20. 6 टेबलस्पूनतेल
  21. 4-5लवंगा
  22. आवश्यकतेनुसार पाणी
  23. कोथिंबीर

कुकिंग सूचना

1तास 15 मि.
  1. 1

    मटण पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले.एका पाॕटमध्ये ठेवून त्यात मटण मसाला दही तिखट हळद धने पावडर कांदा टोमॅटो पेस्ट हिरवी मिरची जीरे लसूण अद्रक बारीक केलेले कोथिंबीर टाकली व चमच्याने चांगले मिक्स करून 1/2 तास झाकण ठेवून राहू दिले.

  2. 2

    कांदा बारीक चिरलेला एका वाटीत ठेवला व एका प्लेटमध्ये कलमी तेजपान मसाला फूल शहाजिरे काजू तुकडे काळे मिरे लवंग साधी विलायची सोलून ठेवली.गॕसवर कुकर ठेवून त्यात तेल टाकून गॕस सुरू केला.तेल गरम झाल्यावर त्यात कांदा टाकला अर्धवट ब्राऊन झाल्यावर प्लेटमधील साहित्य टाकले.

  3. 3

    कांदा ब्राऊन झाला आता कुकरमध्ये मटण टाकले पूर्ण सुटेपर्यंत जवळपास 15 मि. चमच्याने फिरवत राहिलो.मीठ टाकले व पाणी टाकून कुकरचे झाकण लावून 3 शिट्या कमी गॕस करून होवू दिल्या व नंतर गॕस बंद केला.

  4. 4

    कुकर थंड झाल्यावर जेवणासाठी मटण सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes