कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका डिश मधे मैदा आणि पीठ घेऊन त्यामधे तेल व मीठ घालून पाणी टाकून मळून घेणे.व 15 मिनिटे वरतून ओले कापड टाकून बाजूला ठेवणे.
- 2
मूग डाळ मध्ये पाणी टाकून 2 तास भिजत ठेवणे.नंतर त्यातील पाणी काढून टाकून मिक्सर मध्ये डाळ जाडसर वाटून घेणे.आता गॅस वर एका कढई मध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे,हिंग,हळद व लालतिखट टाकून परतणे.नंतर गरम मसाला,आमचूर पावडर,व धने पावडर टाकुन परतणे.आता वाटलेली डाळ व मीठ टाकून 2 मिनिटे एकजीव करन घेणे व वरतून कोथिंबीर टाकणे. हे झाले कचोरि मधील सारण तयार.
- 3
आता कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची छोटी पारी करणे व त्यामध्ये ते डाळीचे सारण भरुन गोळा बंद करून छोटा गोल लाटणे व तेलात तळणे. ही झाली आपली गरमागरम खस्ता कचोरी तयार.चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करणे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12372212












टिप्पण्या