चिंबोरी किंवा खेकड्याचा मस्त चमचमीत रस्सा किंवा कालवण🦀🦀🌿♥️💁🦀

चिंबोरीचा मस्त झणझणीत जाडसर रस्सा हा माझ्या बाबांचा आणि अभि चा सगळ्यात आवडता पदार्थ... मस्त भरलेली चिंबोरी बाजारात आली की आई आवडीने भरपुर खेकडे अभिसाठी आणते. गरमागरम वाफाळता भात, कापलेला कांदा-टाॅमेटो आणि झणझणित खेकडा रस्सा म्हणजे अफलातून जोडी...चांगला अर्धा पाऊण तास जेवण संपवायला लागतो.
मस्त काळी मोठाली उत्तम चिंबोरी असली तर मग अजूनच भारी काम होते. आणि गाभोळी भरलेली म्हणजे अगदीच झक्कास काम... खेकड्याचे फांगडे किंवा डांगे दोरीने बांधून मुरडून दिले असतात. खेकडे, चिंबोरी म्हणा किंवा शेलफिश... मला त्याची अॅलर्जी असल्याने मी खायला धजावत नाही पण ह्या रस्स्याच्या अप्रतिम वासाने चव घ्यायचा मोह मात्र मी टाळत नाही.🍲🧄🌶️🥥
भाईंदर ला भल्या पहाटे मोठाच्या मोठा मासोळी बाजार लागतो. गंमत म्हणून अभिबरोबर पहाटेच त्या मार्केटला गेलो. कोलंबी, सुरमई, पापलेट, रावस, बोंबील असे ताजे फडफडीत मासे टोपल्या, मोठे मोठे tray आणि पाट्यांमधून भरून मासेवाल्या विकत असतात. अगदी स्टेशनला लागून वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची चिंबोरीचे विक्रेते असतात. त्यांच्याकडून नीट शोधून चिंबोरी घेतली.🍲😀
नायलाॅनच्या निळ्या जाळीत पकडलेली, फांगडे बांधलेल्या चिंबो-यांना घेऊन टोपलीत घालून मासेवाल्या बायका किंवा पुरूष विकायला आणतात... पोर्णिमे अमावस्ये वेळच्या चिंबो-या भरले-या असतात असे म्हणतात. चिंबोरी गरम त्यामुळे सर्दी खोकला झाला किंवा थंडी पडली कि आवर्जून हा रस्सा करतात. 🥘🦀🦀
चिंबोरी मस्त भरलेली आणि काळसर पाठीची शोधून घ्यावीत. फांगडे किंवा डांगे अलगद काळजीपूर्वक मोडून घ्यावेत. माती लागली असेल तर घासून घ्यावी व चिंबोरी आतून देखील स्वच्छ करावी.
#seafood #सीफुड
कुकिंग सूचना
- 1
आता पाहुया झणझणीत, चमचमीत खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा ते.... ही पध्दत आई रश्मी इंदूलकर कडून घेतलेली आहे. चमचमीत लागते. नक्की करून पहा.
तर मग साफ केलेले खेकडे एका परातीत घेऊन त्यांना मीठ, आलेलसूण पेस्ट आणि रोजच्या वापरातील घरगुती मसाला हे सर्व एकत्र करून लावून ठेवावे. जवळजवळ अर्धा ते एक तास मुरू/ मॅरिनेट होऊ द्या.
- 2
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करत ठेवा. बारीक कापलेला एक कांदा एकदम मस्त गुलाबीसर शिजवून घ्या. त्यावर बेडगी किंवा काश्मिरी मिरची पावडर १ ते दिड चमचा टाकून व्यवस्थित परता. रंग सुरेख येतो.
- 3
मसाला लावून मुरवत ठेवलेले खेकडे टाकून, वरखाली करत फोडणीत एकदम नीट परतून घ्या. आच मध्यम करा. झाकणावर पाणी ठेवून पंधरा मिनिटे खेकडे वाफेवर शिजवा.
पंधरा मिनिटांनंतर झाकण काढून, खेकडे परतून घ्या. कांदा-खोब-याचे बारीक वाटलेले वाटण टाकून परतून घ्या.
त्यावर झाकणावरचे गरम पाणी ओतून दहा मिनिटे उकळी येऊ द्या. घमघमाट सुटला असेल. - 4
आता खेकड्याच्या पायांना वाटून केलेले पाणी त्यात ओता. आणि कोथिंबीर देखील टाका. पंधरा मिनिटे उकळले कि तुमचा चमचमीत झणझणीत खेकड्याचा रस्सा किंवा कालवण तयार!!!
चपाती, वाफाळता भात किंवा भाकरीसोबत खुप मस्त लागतो. ♥️😀💁
- 5
Please note: पोर्णिमे अमावस्ये वेळच्या चिंबो-या भरले-या असतात असे म्हणतात. चिंबोरी गरम त्यामुळे सर्दी खोकला झाला किंवा थंडी पडली कि आवर्जून हा रस्सा करतात. 🥘🦀🦀
चिंबोरी मस्त भरलेली आणि काळसर पाठीची शोधून घ्यावीत. फांगडे किंवा डांगे अलगद काळजीपूर्वक मोडून घ्यावेत. माती लागली असेल तर घासून घ्यावी व चिंबोरी आतून देखील स्वच्छ करावी.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
बोंबील ग्रीन रस्सा (bombil green rasa recipe in marathi)
हा बोंबिल चा रस्सा भातासोबत खूप मस्त लागतो. गरमागरम भात त्यावर हा रस्सा.... आणि सोबतीला कुरकुरीत तळलेले बोंबील..... Sanskruti Gaonkar -
झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा (tambda rassa recipe in marathi)
#EB5#W5"झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा" तांबडा आणि पांढरा रस्सा म्हटलं, की अस्सल गावरान चव जिभेवर रेंगाळते नाही का!!!!, नॉनव्हेज प्रेमींच्या आवडीचा विषय म्हणजे तांबडा-पांढरा रस्सा, यात चिकन किंवा मटण आपापल्या आवडीनुसार वापरले जाते..आणि खास थंडीच्या दिवसात तर या झणझणीत आणि मसालेदार रश्श्याला खूपच चव येते नाही का.....!!!!चला तर मग झटपट अशी रेसिपी पाहूया . Shital Siddhesh Raut -
कोलंबी नवलकोल रस्सा (Kolambi Navalkol Rassa Recipe In Marathi)
कोलंबी ही मच्छी घरातील सर्वांनाच आवडते कारण त्याच्यात काटे नसतात. लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत कोलंबी खाऊ शकतात, फक्त कोलंबी पांढरी असावी म्हणजे सर्वांना पचण्यासाठी हलकी असतात. लाल रंगाची किंवा शीळी कोळंबी कधीही घेऊ नये, ती वातूळ असतात आज आपण नवलकोल कोलंबी हा अतिशय उत्कृष्ट चवीचा रस्सा बघणार आहोत. Anushri Pai -
मक्याच्या पोह्यांचा चिवडा (makyacha pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 5#चिवडा# चिवड्या शिवाय दिवाळीची मजाच नाही! तसाही आजकाल आपण चिवडा हा प्रकार कधीही करतो ...पण तरीसुद्धा दिवाळीत चिवड्याचे महत्व कमी होत नाही! 😜 यावेळेस मी वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे😀 केले आहेत! त्यातीलच हा एक प्रकार! म्हणजे मक्याच्या पोह्यांचा चिवडा ....यातील कॉमन पदार्थ, जे बाकी ची वड्यानाही लागणारे आहेत ते, म्हणजे शेंगदाणे, फुटाणे, खोबरे ,काजू हे मी आधीच तळून घेतलेले आहे! त्यामुळे चिवडा करताना वेळ वाचतो! तर बघूया मक्याच्या पोह्यांचा चिवडा.... Varsha Ingole Bele -
माकली रस्सा
माकली , माकुल , माखुळ , Fresh Squid , Calamari असे ह्या मासाचे नावे आहेत. हा मासा खाण्यास खूप चवीष्ट अगदी खोबर्या सारखे. पण माकली साफ करण म्हणजे थोडसं कष्टाचं काम आहे. ह्या मासाचे डोके,डोळे व शरीराचा भाग हाताने सहज वेगळे करता येते. माकली वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची, अश्या प्रकारे माकली साफ करा. आज आपण एक मस्त रेसिपी करु अगदी चिकन आणि मटणाला सुद्धा मागे टाकेल...तर चला साहित्य आणि कृती कडे Chef Aarti Nijapkar -
इन्स्टंट कुरकुरीत सांडगे (instant kurkurit sandge recipe in marathi)
उन्हाळ्यात काही कारणाने सांडगे बनवता आले नाही, किंवा शहरात राहणाऱ्यांना सुकायला कुठे घालावे असा अनेकांना प्रश्न असतो.. .. किंवा बनवलेले संपले असतील तर.. पावसाळ्यात घरात भाजी नसेल तर..या सगळ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.. मस्त कुरकुरीत सांडगे तयार होतात....याचा रस्सा बनवा किंवा असेच खायला ही छान कुरकुरीत लागतात... नक्की ट्राय करा.. चला तर मग माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
बोंबील कांदा फ्राय
सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.गरमागरम भात, चिंचेचे सार, तळलेला कांदा बोंबील अफलातून जेवण होत. सोबत सुक्का भाजलेले बोंबील😋😋 ह्या भाजीत तुम्ही आवडत असल्यास पातळ बारीक चिरलेला बटाटा सुद्धा घालू शकता. Prajakta Patil -
पाटवडी रस्सा किंवा पाटोडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #शुक्रवार#पाटवडी रस्सा पाटवडी रस्सा महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक.. नागपूर विदर्भातील एक पारंपारिक चमचमीत आणि झणझणीत पदार्थ.. नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. साधारणपणे पावसाळ्यात केली जाणारा हा पदार्थ.. जेव्हां भाज्या मिळत नाहीत किंवा भाज्यांची कमतरता असते त्यावेळेस बाहेर धो-धो पाऊस आणि घरात गरमागरम पाटवडी रस्सा बेत .. अफलातून कॉम्बिनेशन.. खरंतर विदर्भातील, नागपुरातील जेवण हे देखील कोल्हापूर सारखेच चमचमीत आणि झणझणीत.. नागपूर म्हटले की आठवतो तो सावजी रस्सा .. नाका तोंडातून धूर काढणारा.. त्याचप्रमाणे हा पाटवडी रस्सा .. लालबुंद रंगाचा..विदर्भात,नागपुरात घरी पाहुणे यायचे म्हटले की पुडाची वडी, पाटवडी रस्सा,श्रीखंड.. हा बेत हमखास असतोच तसेच लग्नसमारंभात लग्न घरी पुडाची वडी,पाटवडी रस्सा आणि श्रीखंड हा बेत हवाच.. लेकी बाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी आल्या की त्यांच्या आया हा बेत हमखास करणारच.. आणि आपल्या लेकींना प्रेमाने खाऊ घालणार .आईचं प्रेम ते ..कुठल्याही प्रदेशात राहणारी आई असो..त्या भागातील जे प्रसिद्ध व्यंजन आहे ते आपल्या मुलीसाठी माहेरी आल्यावर करतेच करते.असो..तर विदर्भाची स्पेशालिटी असलेला पाटवडी रस्सा मी पहिल्यांदाच करून बघितलेला आहे.. चमचमीत झणझणीत पाटवडी रस्सा अफलातून झालाय.. सगळ्यांनाच नाविन्यपूर्ण पदार्थ खूप आवडला.. Cookpad मुळे वेगवेगळ्या प्रदेशातील नवनवीन रेसिपी करायला मिळतात आणि चाखून बघायला मिळतात.. खूप खूप आभार..🙏 चला माह्या किचन कडे..सांगते तुमाले पाटवडी रश्श्याची गोष्ट..😊 Bhagyashree Lele -
सांज्यांच्या पुऱ्या (साटोळ्या,/सांजोळी) (sanjoryachya purya recipe in marathi)
#ashrWeekend_recipe_challengeसांजोऱ्या’/सजोऱ्या हा पदार्थ प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात बनवला जातो.सांजोऱ्या म्हणजे सांज्याच्या पोळ्या. भरपूर दूध आणि गूळ घालून रव्याचा मऊसर सांजा केला जातो आणि पुरणपोळीच्या पुरणाप्रमाणे तो कणकेत भरून सांजोऱ्या करतात. 👉मुख्य म्हणजे याचा पुरणपोळी किंवा गुळाच्या पोळीसारखा मोठ्ठा घाट पडत नाही.गुबगुबीत दुलईसारख्या रेशमी आणि तितक्याच चविष्ट असतात सांजोऱ्या.👉ही साज्यांची पुरी एक पारंपरिक पदार्थ म्हणून ओळखली जाते,आषाढ महिनात आखाडीला आमच्या ईथे #कवळी केली जाते. 🙏🌹😋😋🤗त्या मध्ये हा साटोळी पदार्थ महत्त्वाचा आहे कारण या शिवाय पुजेची मांडणी च पुर्ण होत नाही......., याचेही महत्त्व असे की या सांजोळी नैवेद्य ला पण बनविल्या जातात मग ते गणपती ला असो की अक्षय तृतीयेला ......आधी च्या काळात त नैवेद्य हा साज्यांची पुरीचाच व्हायचा, ...... 😋😋तसेच हा पदार्थ खांदेशात पण बनवतात 😋😋 चला तर पाहुया सांजोळी, सांज्यांच्या पुऱ्या 🤗👉 Jyotshna Vishal Khadatkar -
घोळ मासा आणि शेवग्याच्या शेंगांचे कालवण
#सीफूडमाझ्या माहेरी समुद्र किनारा जवळ असल्याने नेहमी ताजे मासे मिळत. त्यात घोळ मासा असला की आमची चंगळ. खूप महाग पण बहुगुणी आणि सुपर टेस्टी असल्यामुळे आजही घोळ असली की मी खुश😄😋😋 आमच्या एडवण च्या कोळी बांधवांकडील लग्नाची हळद तर या फिशकरी शिवाय अपूर्णच...तर असा हा चविष्ट आणि बहुगुणी मासा. याचा ऑपरेशनमधील टाक्यांसाठी आणि इतर ही वैद्यकीय उपयोग आहेत. Minal Kudu -
तांदळाची पेज (tandalache pej recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज.. #तांदळाची पेज.. तांदळाची पेज कोकणातील एक पारंपारिक न्याहारीचा पदार्थ.. कोकणामध्ये भरपूर पाऊस उष्ण दमट हवामान या भात पिकासाठी लागणाऱ्या भौगोलिक दृष्ट्या आवश्यक गोष्टी लाभल्या आहेत त्यामुळे साहजिकच येथे भात पिकाचे उत्पन्न जास्त घेतले जाते . म्हणूनच तांदूळ आणि तांदळाचे पासून बनवले जाणारे पदार्थ आहारामध्ये प्रामुख्याने आहे. या तांदळापासून पेज खिरी घावणे आंबोळ्या मोदक बोरं,सांदणं, खापरोळ्या असे विविध प्रकार जेवणामध्ये करतात.. जे जास्त प्रमाणात पिकतं त्याचाच मुख्यत: आहारात उपयोग केला जातो.. या तांदळाच्या पेजेच्या बाबतीत माझ्या खूप छान आठवणी आहेत. पहिली म्हणजे साधारण 1935 ते 40 या काळातील. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती..माझ्या चुलत सासुबाई मला नेहमी सांगायच्या की त्यांच्या सासूबाई म्हणजे माझ्या पणजी सासूबाई सकाळी अंघोळी वगैरे उरकल्या की साडेआठ पावणे नऊ वाजता सगळ्या सुनांना भरपूर तूप घातलेली वाडगाभर दमदमीत अशी तांदळाची पेज न्याहारी म्हणून खायला देत असत आणि म्हणत.. आता लागा कामाला.. कारण संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत जेवण होईपर्यंत सगळ्या सुनांना दुपारचे दोन अडीच वाजायचे जेवायला कारण एकत्र कुटुंबाचं मोठं खटलं होतं.. त्यामुळे जेवण होईपर्यंत सर्व सुनांची पोट भरलेली असायची..भूक लागत नसे..दुसरी आठवण माझी मुलं लहान असताना आजारी पडली ताप आला आमच्या पोळ्या वाल्या मावशी त्यांना खाण्यासाठी पचायला हलकी अशी ही तांदळाची पेज लगेच करून देत असत. अशा या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी आज कोकण रेसिपी च्या निमित्ताने वर आल्यात.चला तर मग माझ्या पणजी सासूबाईंची, आणि आमच्या पोळीवाल्या मावशी ज्यांना आम्ही मुन्ना म्हणत असूत्यांचीअतिशयसोपीपौष्टिक तांदळाच्यापेजेची रेसिपी Bhagyashree Lele -
खेकड्याचा मालवणी रस्सा (Khekdyacha Malvani Rassa Recipe In Marathi)
#KGRदिवाळीचा फराळ खाऊन संपल्यानंतर काहीतरी झणझणीत खावं असं नक्कीच वाटतं आणि त्यावर छान उपाय म्हणजे खेकड्याचा मालवणी रस्सा. त्याची चव काय वर्णावी! चार घास जास्त जातात जेवणाचे, मग तो गरम गरम भात असो किंवा छान लुसलुशीत पराठा असो खेकड्याचा रस्सा जेवणाची लज्जत वाढवतो आणि मालवणी रस्सा नक्कीच गृहिणीला शाबासकी देऊन जातो. Anushri Pai -
लाटीव वडी (Latvian vadi recipe in marathi)
#FDही वडी माझ्या सासू अतिशय उत्कृष्ट बनवितात. त्यांच्याकडून मी शिकले. वडीचा हा प्रकार मला आणि घरातील सर्वांनाच आवडतॊ . त्यामुळे ही रेसिपी तुम्हीही करून बघावी म्हणून हा प्रयत्न.. ही वडी लांबच्या प्रवासात घेऊन जायला अतिशय उत्तम. Manisha Satish Dubal -
रवा फिंगर्स
#रवाLockdown मुळे रव्या चा डोस, ढोकळा, उत्तपा, इडली लाडू ,शिरा असे खुप काही प्रकार बनवून झाले आणि माझ्या लेका ने अचानक काही चटपटीत खायला मागितला। तेंव्हा हे रेसिपी घडली अर्थातच रवा फिंगर्स। खूप सरळ आणि चटकन बननारा हा प्रकार आहे। Sarita Harpale -
#भरलेली_मसाला_शेवंडी 🦞🌿🌶️#Stuffed_Spiced_Lobster 🦞❤️
एडवणगावाजवळच्या कोरे गावामधून छान दर्जेदार आणि चविष्ट अशा मोठ्या आकाराच्या शेवंडी मिळतात. किंमतीला महाग पण चवीला अगदी जबरदस्त अशा ह्या शेवंडी म्हणजेच लाॅबस्टरचा एक वेगळाच चाहतेवर्ग आहे. दिसतातही आकर्षक. ह्यात काही निळसर छटेच्या शेवंडींना तर फार मागणी असते. वजनदार आणि टणक सालाच्या शेवंडी सोलून साफ करणे तसे कठीण काम. 🦞🌶️🌿 पण खवय्ये म्हटले कि हे आव्हानही सहज पेलतात.शेवंडीचे स्टार्टर आम्ही अनेकदा बनवतो पण ह्यावेळी जोडल्या वेगळ्या पध्दतीने केले आहे. 🦞🧄🍤🌿❤️🌶️कापताना धारधार सुरा किंवा विळीचा वापर करावा लागतो. शेवंडीच्या तोंडावरचे काटे टोचू नयेत म्हणून डोक्याचा भाग फडक्यात पकडून विळीवर कापून घ्यावेत. डोक्याच्या भागातील माती व घाण स्वच्छ धुवून काढावी. पाठीवर असलेला घाणीचा दोरा काढायचा. रस्सा किंवा अन्य रेसिपी वेळी पेरातून आडवे व बारीक तुकडे करावे. जाड साल टाकून द्यावी.🦞चला भरलेली मसालेदार, बटर गार्लिक आणि लिंबाचा punch असलेली शेवंडी बनवुया. 😋 #सीफुड #seafood Sneha Chaudhari_Indulkar -
व्हेज पांढरा रस्सा (veg pandra rassa recipe in marathi)
#EB4#W4 आज माज्या शहरातील खूप प्रसिद्ध अशी पाककृती मी शेयर करत आहे ती म्हणजे व्हेज पांढरा रस्सा.कोल्हापूर म्हणलं की शाहूची नगरी, रांगड्या मातीचं शहर, कोल्हापूर माझं माहेर, माजी जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून मला त्याचा फार अभिमान आहे व सदैव असेलच.अश्या या माज्या शहरातील बरेच पदार्थ प्रसिद्ध आहेत.तसं म्हणलं तर कोल्हापूरकर हौशी खवय्ये असतात त्यामुळे खूप व्हेज ,नॉन व्हेज पदार्थ इथे बनवले जातात व खाल्ले जातात.कोणी कोल्हापूरला आले आणि कोल्हापुरी मिसळ ,वडा खाल्ला नाही असे होत नाही तसेच कोल्हापूर चा तांबडा -पांढरा रस्सा हे तर खूप प्रसिद्ध आहे कोल्हापूर ला पण हा रस्सा नॉन व्हेज असल्याने शाकाहारी लोकांचा व्हेज पांढरा रस्सा कसा करायचा ते मी आज सांगेन करून बघा ही पाककृती अप्रतिम लागते व्हेज रस्सा पिलात तर नॉन व्हेज रस्सा वीसराल,मग बघूयात कसा करायचा तर Pooja Katake Vyas -
गावरान पुदिना चटका (gavran pudina chatka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #goldenapron3 week23 ह्यातील की वर्ड आहे पुदिना आहे त्यासाठी ही रेसिपी मी दाखवते आहे. शिवाय रेसिपीबुक week2 --2.मध्ये गावाकडच्या रेसिपी टीमसाठी पण ही रेसिपी अतिशय समर्पक आहे त्यामुळे मी ही रेसिपी शेअर करते. खूप टेस्टी लागते. आमचे गावी भुसावळ सावदा येथे माझी काकू आजी कडून मी ही शिकली. खूप सुगरण आहे ती. हा चटका भाकरी सोबत खातात. फार यम्मी लागतो. Sanhita Kand -
चमचमीत तर्रीवाली मिसळ पाव
#स्नॅक्स#शुक्रवार_मिसळपाव#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर मिसळ म्हटली की डोळ्यासमोर येते,ती झणझणीत आणि चमचमीत तर्रीवाली करी, त्या वर पसरलेला फरसाण...सोबत कांदा आणि लिंबू... अहाहा...तोंडाला पाणी सुटले ना... चला तर मग मस्त अशी मिसळ रेसिपी बघूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
व्हेज पांढरा रस्सा (veg pandra rassa recipe in marathi)
#KS2 महाराष्ट्र किचन स्टार ह्या आपल्या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र ही थीम कूकपॅड कडून सध्या दिलेली असून त्या अंतर्गत मी आज माज्या शहरातील खूप प्रसिद्ध अशी पाककृती आज शेयर करत आहे ती म्हणजे व्हेज पांढरा रस्सा. कोल्हापूर म्हणलं की शाहूची नगरी, रांगड्या मातीचं शहर, कोल्हापूर माझं माहेर, माजी जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून मला त्याचा फार अभिमान आहे व सदैव असेलच.अश्या या माज्या शहरातील बरेच पदार्थ प्रसिद्ध आहेत.तसं म्हणलं तर कोल्हापूरकर हौशी खवय्ये असतात त्यामुळे खूप व्हेज ,नॉन व्हेज पदार्थ इथे बनवले जातात व खाल्ले जातात. कोणी कोल्हापूरला आले आणि कोल्हापुरी मिसळ ,वडा खाल्ला नाही असे होत नाही तसेच कोल्हापूर चा तांबडा -पांढरा रस्सा हे तर खूप प्रसिद्ध आहे कोल्हापूर ला पण हा रस्सा नॉन व्हेज असल्याने शाकाहारी लोकांचा व्हेज पांढरा रस्सा कसा करायचा ते मी आज सांगेन करून बघा ही पाककृती अप्रतिम लागते व्हेज रस्सा पिलात तर नॉन व्हेज रस्सा वीसराल,मग बघूयात कसा करायचा तर Pooja Katake Vyas -
अननस सासव किंवा अननस सासम.. (anasas sasav recipe in marathi)
#दक्षिण #कर्नाटक #दक्षिण भारत रेसिपीजमाझ्या एका GSB मैत्रिणीच्या मुलाच्या मुंजीला मी गेले होते.. त्या मुंजीच्या जेवणात मी पहिल्यांदा अननसाचे सासव खाल्ले. खूप रुचकर खमंग चटपटीत अशा चवीचे ते होते. म्हणूनच तिच्याकडे सहज मी चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की गोव्यापासून ते कर्नाटक राज्यातील उडपी, मेंगलोर ,कारवार या जिल्ह्यांमध्ये अननसाचे सासव प्रामुख्याने शाकाहारी जेवणात करतात. पण प्रामुख्याने उडुपी मंगलोरमध्येकरतात.गप्पांच्या ओघात उडुपी चं तेराव्या शतकात बांधलेलं श्रीकृष्ण मंदिर मठ आणि एक हजार वर्षांपूर्वी चे जुने भगवान शंकरांचे चंद्रमौलेश्वर मंदिर तसेच उडुपी रेस्टॉरन्ट मधील स्वादिष्ट व्यंजने आणि शिक्षणाची पंढरी मणिपाल , माल्पे चा अद्भुत नितळ बीच,सेंट मेरीज हे निसर्गाच्या सृष्टिसौंदर्याने नटलेले नितांत सुंदर शांत रम्य बेट ही सर्व बघण्यासाठी तू नक्कीच एकदा तिकडे भेट दे असेही आवर्जून सांगितले . मैत्रिणीने एक मजेदार कथा सांगितली ती अशी आपल्या 27 नक्षत्रांनी,तारृयांनी चंद्राबरोबर लग्न केलं होतं आणि त्यानंतर लगेच चंद्राचा आपला प्रकाश, आपली चमक लुप्त झाली. मग यावर उपाय म्हणून चंद्र आणि तारे यांनी भगवान शंकरांचे शिवलिंग तयार केले आणि त्याची पूजा केली .. ते चंद्रमौलेश्वर शिवलिंग.. संस्कृत मध्ये उडू चा अर्थ आकाशातील चंद्र-तारे आणि पा म्हणजे स्वामी.. म्हणून चंद्र तार्यांचा स्वामी.. चंद्राला धारण करणारे चंद्रमौलेश्वर म्हणजेच भगवान शंकर यांच्यावरून उडुपा.. किंवा उडुपी हे नाव त्या भागाला मग मिळाले.. किती रोचक आहे ना कथा.. म्हणून याला चंद्रआणि तार्यांची भूमी देखील म्हणतात..किती सखोल ज्ञान होते तिच्याकडे..काही क्षण माझी मलाच लाज वाटली.. तर असे हे आंबा,अननस सासव तिकडे घरघरातून ओरपतात Bhagyashree Lele -
फ्लावर बटाटा रस्सा भाजी
फ्लॉवर या भाजीचे अनेक उपयोग होतात. बिर्याणी, पुलाव,सुकी भाजी,भजी त्याचप्रमाणे आज आपण पाहतोय ती रस्सा भाजी. या रस्सा भाजी मध्ये सुद्धा अनेक प्रकार करता येतात. आज आपण चविष्ट अशी आणि झटपट तयार होणारी भात किंवा भाकरी दोन्ही बरोबरही खाता येण्यासारखा रस्सा भाजी बघूया. Anushri Pai -
अंड्याचा पांढरा रस्सा (अंडा करी) (anda curry recipe in marathi)
#cf#Andacurryकोल्हापूरची खाद्यसंस्कृती इतर खाद्यसंस्कृतीपेक्षा थोडी वेगळी आहे. वेगळी आणि वेगळेपणा टिकवणारी आहे. बदलत्या काळातही हे वेगळेपण कायम राहिले आहे. कोल्हापुरी 'ठसका, 'झटका', 'भुरका' ही खाद्यसंस्कृतीची वैशिष्टये. मांसाहार आणि कोल्हापूर यांचे नाते पिढ्यानपिढ्याचे आहे. घरात एखादा पाहुणा आला आणि त्याला मटणाचा पाहुणचार केला नाही तर त्या पाहुण्याचा अपमान समजतात. बारसे, केळवण, जावळ वाढदिवस अशा समारंभातही मांसाहारी जेवणाला प्राधान्य असते. घरगुती मसाल्याने जेवण चविष्ट बनते, झणझणीत रस्स्यामुळे घामाच्या धारा कपाळावरून वाहत राहिल्या तरी रस्साच्या वाटीची चव परत परत जिभेला खुणावेल अशा चवीचा तांबडा रस्सा असतो त्यावर उतारा म्हणून पांढरा रस्साही त्याबरोबर सर्व्ह करतात आपण चिकनचा तांबडा पांढरा रस्सा किंवा मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असे कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीमधले पदार्थ ऐकले आहेत परंतु तिथे अंड्याचाही पांढरा रस्सा बनवला जातो तो कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवते आहे, चला तर मग बघुया कोल्हापुरी अंड्याचा पांढरा रस्सा😋 Vandana Shelar -
कोल्हापूरी तांबडा रस्सा (kolhapuri tambda rassa recipe in marathi)
रविवार विशेष किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर आमच्या घरी झणझणीत तांबडा रस्सा चिकन किंवा मटणणाचा... त्याशिवाय पाहुणचार पुरा होत नाही...आज मी चिकन चा तांबडा रस्सा बनवणार आहे... Smita Kiran Patil -
🥬काकडीची तंबळी आणि भात
🥬तंबळी" हा एक पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ आहे. विशेषतः, ती एक प्रकारची चटणी किंवा रस्सा आहे, जी नारळ, दही किंवा ताक आणि मसाल्यांपासून बनवतात. ती भातासोबत खाल्ली जाते. असे गुगल सांगते P G VrishaLi -
मसाला रस्सा उसळ
#फोटोग्राफीमसाला रस्सा उसळआज मुल म्हणत होती की ,"आई आज काही तरी रस्सा ची भाजी बनाव, पण रस्सा भाजी बनवण्या साठी भाज्या नवत्या, अंडा करी बनाऊ म्हंटले तर अंड नवते, तर मग फ्रीज मधे बघितले तर मोड आलेले मूग होते, मूग दिसले मुलांना तर त्यांनी वाकडे तिकडे तोंड बनविले, मी मग विचार केला आणि झणझणीत रस्सा उसळ बनविते असे ठरविले, आणि केली मस्त झणझणीत उसळ, पण जेव्हा जेवली मुल तर एकदम खुश ,,म्हणतात कसे आई आता उसळ अशीच बनवीत जा आणि नेहमी बनव...... Sonal Isal Kolhe -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soupसूपमध्ये टोमॅटो सूप हा सर्वांचा आवडता सूप प्रकार. अतिशय पौष्टीक आणि व्हिटॅमिन ए, सी, के आणि पोटॅशिअम अशा भरपूर पोषकद्रव्यांनीयुक्त असे हे सूप अगदी सोप्या पद्धतीने मी आपणासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
♦️आले बटाटा वडी
♦️आपल्या आल्याचा भरपूर वापर होतो . चहा तर नेहेमीच होतोमी उप्पिट ,पोहे अथवा भाज्या ,रस्सा यात पण त्याचे पातळ काप वापरतेया आहेत आल्याच्या आणि बटाट्याच्या वड्या, नेहमीच्या आलेवडी किंवा आलेपाक पेक्षा तशा मऊ असतात.मात्र करायला सोप्या आणि चवीलाही छान.थंडीच्या मोसमात चवदार आणि पौष्टिक P G VrishaLi -
बटर कुकीज(नो बेकिंग पावडर/ सोडा) (butter cookies recipe in marathi)
#GA4 #week12 # कुकीजआजची ही कुकीज रेसिपी माझ्या दीप्ती वर्तक या मैत्रिणीची आहे. ती एक उत्कृष्ट होम बेकर आहे. तिची रेसिपी वापरून केलेल्या या कुकीज खाल्ल्यावर तोंडामध्ये विरघळून जातात. मस्त क्रिस्पी, टेस्टी कुकीज आणि त्या पण कमी वेळात, कमी साहित्यामध्ये. यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा अजिबात वापरलेला नाही ,मी फक्त या कुकीचा फ्लेवर बदलला आहे. थँक्यू दीप्ती!! तुम्ही सर्व नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
"खान्देशी स्पेशल वांग्याचे भरीत" (vangyache bharit recipe in marathi)
#KS4"खान्देशी स्पेशल वांग्याचे भरीत" माझे शेजारी जळगाव वाले आहेत,त्यांची हिरव्या वांग्याचे भरीत ही रेसिपी आठवड्यात दोन वेळा असतेच..मी आज त्यांच्या पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे.खुप मस्त झणझणीत,मऊसुत झाले आहे भरीत.चला तर रेसिपी बघुया. लता धानापुने -
आमरस कच्च्या आंब्याचा (Amras kachya ambyacha recipe in marathi)
#amr #आमरस ... म्हणजे कच्च्या आंब्याचे शिजविलेले पन्हे... हा आमरस फक्त अक्षयतृतीया या दिवशीच केला जातो विदर्भात... आणि यासोबत अर्थातच कुरोड्या, पापड्या, सरोळे असतात.. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या