फराळी सूशी

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
Mumbai

#उपवास
फराळी सूशी हा खास उपवासासाठी बनविला आहे वरीचा भात बनवून , तूपात वाफवलेले बटाटे तुकडे , जिरे मिरचीची फोडणी देऊन शेंगदाणे परतवून त्यात चवीनुसार मीठ साखर घालून भाजी बनवली व वरीच्या भातात रोल केला

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

३५ ते४० मिनिटे
  1. १/२ वाटीवरीचे तांदूळ
  2. २ वाटी पाणी किंवा गरजेनुसार
  3. मीठ किंचित
  4. बटाट्याची भाजी
  5. २ ते ३उकडलेले बटाटे
  6. १ चमचातूप
  7. १/२ लहान चमचाजिरे
  8. १ ते २हिरवी मिरची
  9. २ मोठे चमचेशेंगदाणे
  10. मीठ चवीनुसार
  11. १/२ लहान चमचासाखर

कुकिंग सूचना

३५ ते४० मिनिटे
  1. 1

    वरीचे तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे

  2. 2

    मग पाणी घालून त्यात मीठ मिसळावे व गॅस वर ठेवून द्या शिजण्यासाठी तांदूळ वाफेवर छानसं शिजवून घ्या
    वरीचा भात शिजला की गार करत ठेवा

  3. 3

    बटाट्याची भाजी पॅन तापवून त्यात तूप घाला जिरे, हिरवी मिरची घालून परतवून घ्या
    शेंगदाणे तुपावर भाजून घ्या वाफवलेले बटाटे सोलून त्याचे मध्यम आकाराचे काप करून घ्या
    कापलेले बटाटे पॅन मध्ये घालून एकत्र करून घ्या चवीनुसार मीठ व साखर घालून एकजीव करून झाकण ठेवून वाफवून घ्या
    भाजी झाली की एका ताटात काढून गार करून घ्या

  4. 4

    आता किचन पेपर घ्या किंवा एक सुती रुमाल भिजवून घट्ट पिळून घ्या व थोडं तेल लावून घ्या
    त्यावर भात पसरवून घाला व वरून थोडं दाबून घ्या व चौकोनी आकार तयार करा

  5. 5

    एका बाजूला बटाट्याची भाजी घाला व रुमलाच्या किंवा पेपरच्या साहाय्याने घट्ट रोल करून घ्यावे
    घट्ट केलेला रोल १० मिनिटे ठेवावे मग रुमाल किंवा किचन पेपर काढून गोलाकार कापुन घ्यावे

  6. 6

    एका ताटात ठेवून त्यावर हवं असेल तर उपवासाची हिरवी चटणी किंवा खजुराच्या चटणी सोबत खाऊ शकता

  7. 7

    टीप
    वरीचा भात शिजवताना खूप पाणी घालू नये वाफेवर छान शिजून येतो

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
रोजी
Mumbai
Foodieshttps://aartinijapkar.blogspot.comhttps://www.facebook.com/aarticakes.more
पुढे वाचा

Similar Recipes