पनीर अंगारा

Prajakta Bagul
Prajakta Bagul @cook_19721653

पनीर रेसिपी स्पर्धा

पनीर अंगारा

पनीर रेसिपी स्पर्धा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ - ५
  1. २५० ग्राम पनीर
  2. ४ मध्यम आकाराचे टोमॅटो
  3. १ इंच आले
  4. २ हिरव्या मिरच्या
  5. २ सुक्या लाल मिरच्या
  6. १/२ च. जिरे
  7. 1दालचिनी तुकडा
  8. तमालपत्र
  9. हिरवी वेलची
  10. लवंगा
  11. काळीमिरी
  12. २-३ च. काजू
  13. १/२ च. हळद
  14. २ च. भोईर मसाला
  15. १ च. धने पावडर
  16. १ च. कसुरी मेथी
  17. सिमला मिरची
  18. १/२ वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
  19. ३ - ४ च. तेल
  20. मीठ चवीनुसार
  21. १/४ च. हिंग
  22. १ च. बटर
  23. १ मोठा तुकडाकोळशाचा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम टोमॅटोचे मोठे तुकडे करून घेणे. नंतर एका पॅनमध्ये १ च. तेल टाकून त्यात जिरे टाकणे. मग दालचिनी, तमालपत्र, हिरवी वेलची, लवंग, काळीमिरी टाकून परतून घेणे. नंतर लाल मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, आले व काजू टाकून परतून घेऊन त्यावर झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवणे. गार झाल्यावर त्याची बारीक पेस्ट करून घेणे.

  2. 2

    दुसऱ्या पॅनमध्ये २-३ च. तेल घेऊन त्यात जिरे व हळद घालून टोमॅटोची पेस्ट घालणे. धने पावडर, भोईर मसाला, कसुरी मेथी कुस्करून टाकणे. सिमला मिरची चौकोनी कापून टाकणे व ती ह्या मसाला बरोबर तेल सुटेपर्यंत परतून घेणे. मग त्यात १कप पाणी, मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर घालणे. नंतर पनीरचे चोकोनी तुकडे घालणे व थोडे पनीर किसून घालणे. झाकण ठेवून ५-६ मिनिटे शिजवणे.

  3. 3

    एकीकडे दुसऱ्या गॅसवर कोळसा थोडे तेल टाकून गरम करत ठेवणे. मग भाजीच्या मधोमध १ वाटी ठेऊन त्यात कोळसा घालून त्यावर थोडे हिंग आणि तेल टाकून १० मिनिटे गॅस बंद करून झाकून ठेवावे. सर्व्ह करताना वरून बटर व कोथिंबीर घालणे.

  4. 4

    हि भाजी तुम्ही चपाती/फुलका/रोटी कशाही बरोबर खाऊ शकता. कांदा व लसूण न खाणाऱ्यांसाठी पण ही उत्तम पर्याय ठरू शकते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Bagul
Prajakta Bagul @cook_19721653
रोजी

Similar Recipes