कुळीथ पिठलं

Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451

#myfirstrecipe
#Cookpad
चौथीचा प्राथमिक शिष्यवृत्तीचा वर्ग चालू होता, जेमतेम दुपारचे 3 वाजले असतील. आम्ही सगळी पोरे खुश- 1 तासात शाळा सुटणार, उद्या शनिवारची फक्त अर्ध्या दिवसाची सकाळची शाळा आणि रविवारी बाबा बरोबर बसून भरपूर धमाल करायची ,या विचारांनी मनात धिंगाणा घातला होता! गणिताच्या ताम्हणकर बाई फळ्यावर गृहपाठ लिहायला लागल्या आणि तेवढ्यात शाळेचा शिपाई – आमचा लाडका सचिन मामा , जवळपास तेविशीतला , घाई घाई ने वर्गात शिरला.

थेट तो काहीतरी ताम्हणकर बाईंच्या कानात कुजबूजला , बाईंच्या हातातला खडू गळून पडला आणि त्यांचा हसरा चेहरा खररकन उतरला! चाळिशीच्या उंबरठ्यावरच्या आमच्या बाईंना खुर्चिचा आधार घ्यावासा वाटला , रुमालाने तोंड पुसत कापऱ्या आवाजात त्यांनी आम्हाला म्हटले “ बाळांनो , दप्तरे भरून बसा रे, आज आई बाबा किंवा कोणी नातेवाईक आल्याशिवाय घरी जाता नाही येणार तुम्हाला….उद्या शाळा बंद राहील!”
पूर्ण ब्लॉग वाचण्यासाठी :
https://kalimirchbysmita.com/kuilth-pithla-recipe-in-marathi/

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4-5 सर्व्हिंग्ज
  1. साहित्य:
  2. 1/2 कप =60 ग्रॅम्स कुळीथ पिठी /कुळथाचे पीठ
  3. 2मोठे कांदे - १८० ग्रॅम्स लांब व पातळ चिरून
  4. 1/2 कपखवलेला ताजा नारळ
  5. तेल
  6. पाणी
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 1 टीस्पूनजिरे
  9. 5-6लसणीच्या पाकळ्या
  10. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. १/४ टीस्पून हिंग
  13. १/४ टीस्पून हळद
  14. 1 टेबलस्पूनमालवणी मसाला (मालवणी मसाला नसेल तर २ टीस्पून लाल मिरची पूड + १ टीस्पून गरम मसाला)
  15. 2-3कोकम
  16. मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम एका खलबत्त्यात जिरे, लसूण आणि हिरव्या मिरच्या जाडसर कुटून त्यांची पेस्ट करून घ्यावी. मिक्सर वापरला तरी चालेल.

  2. 2

    आता एका वाडग्यात कुळथाची पिठी घेऊन त्यात पाणी घालून सरसरीत पातळ करून घ्यावे. पाऊण कप पाणी घालून मी ही पिठी पातळ करून घेतली आहे.

  3. 3

    एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, हिंगाची फोडणी घालून वाटलेला मसाला घालून घ्यावा. लसूण खरपूस होऊ द्यावी.

  4. 4

    आता कांदा घालून तो मध्यम आचेवर चांगला करडा होऊ द्यावा. त्यात हळद आणि मालवणी मसाला घालून २ मिनिटे चांगला परतून घ्यावा.

  5. 5

    कुळथाचे पीठ घालून घ्यावे आणि मसाल्यात चांगले ढवळून घ्यावे. गरज वाटेल तेवढे पाणी घालून पिठलं हवे तेवढे पातळ करावे. फार जास्त घट्ट आणि पातळ ठेवू नये. हे पिठले कोकणी घरांमध्ये भाताबरोबर जास्त खाल्ले जाते.

  6. 6

    आपण ४ कप पाणी घातले आहे. मीठ घालून घेऊ. मोठ्या आचेवर पिठल्याला चांगली उकळी येऊ देऊ. उकळी आली कि आच मंद करून झाकण घालून पिठलं शिजू देऊ.

  7. 7

    ५ मिनिटे शिजवल्यावर पिठले घट्ट होऊ लागते. कोकम घालून झाकण न घालता अजून २ मिनिटे शिजू देऊ. पीठीचा कच्चेपणा दार झाला कि समजाव पिठले शिजले. आता खवलेला नारळ आणि कोथिंबीर घालून १ मिनिट शिजवून घेऊ.

  8. 8

    पिठले तयार आहे. गरमगरम भाकरी किंवा भातासोबत वाढावे. सोबत एखादा पापड भाजलेला मिळाला कि क्या बात !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes