रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 250 ग्रॅमबासमती तांदूळ
  2. 200 ग्रॅममोड आलेले मिक्स कडधान्ये
  3. 1मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  4. 2 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  5. 1मोठा कांदा उभा चिरलेला
  6. 5/6हिरवी मिरची उभी चिरलेली
  7. 1/2वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1,1/2 टीस्पून गोडा मसाला
  10. चवीनुसार मीठ
  11. 1 टीस्पूनलालमिरची पावडर
  12. 2/3 टीस्पूनतेल
  13. 1चीज क्युब
  14. 50 ग्रॅमबटर
  15. 1 टीस्पूनकसूरीमेथी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम तांदूळ व कडधान्ये स्वच्छ धुवून पूर्ण पाणी काढून घेणे

  2. 2

    नंतर गॅसवर कूकर ठेवावे कुकर गरम झाले की घालावे बटर व तेल घालावे

  3. 3

    बटर व तेल गरम झाले की त्यामधे जिरं घालावे जिरे तडतडले की त्यामधे आल लसूण पेस्ट व हिरवी मिरची घालावी

  4. 4

    नंतर त्यामध्ये कांदा घालून कांदा तेलात गुलाबी रंगावर भाजून घ्यावे

  5. 5

    कांदा भाजून झाल्यावर त्यामधे बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होई पर्यंत परतून घ्यावे

  6. 6

    नंतर त्यामध्ये गोडा मसाला,लालमिरची पावडर,कसूरी मेथी,हळद घालून परतून घ्यावे

  7. 7

    मसाले तेलामधे परतून झाल्यावर त्यामधे बारीक चिरलेली कोथिंबीर व मोड आलेले मिक्स कडधान्ये घालून परतून घ्यावे

  8. 8

    कडधान्ये तेलामधे परतून झाल्यावर त्यामधे तांदूळ घालून परतून घ्यावे

  9. 9

    तांदूळ परतून झाले की त्यामधे चवीनुसार मीठ व एक ग्लास पाणी पाणी घालून कूकर चे झाकण लावून कूकर चा तीन शिट्या करून घेणे

  10. 10

    कुकर थंड झाल्यावर कुकरचे झाकण काढून घ्यावे व पुलाव सर्व्हिंग बाऊल मधे काढून त्यावर चीज किसून घालावे व वरून थोडी कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व्ह करावे

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
रोजी
Thane

Similar Recipes