स्प्राऊट फ्राईड राईस (sprout fried recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#GA4 #week11 #Sprouts #Green onions
क्रॉसवर्ड पझल मधील 'Sprouts' आणि 'GreenOnions' हे कीवर्ड्स सिलेक्ट करून मी स्प्राऊट फ्राईड राईसची रेसिपी बनविली आहे.

स्प्राऊट फ्राईड राईस (sprout fried recipe in marathi)

#GA4 #week11 #Sprouts #Green onions
क्रॉसवर्ड पझल मधील 'Sprouts' आणि 'GreenOnions' हे कीवर्ड्स सिलेक्ट करून मी स्प्राऊट फ्राईड राईसची रेसिपी बनविली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपशिजवलेला भात
  2. 1 टेबलस्पून तेल
  3. 1 टेबलस्पून जीरे
  4. 1/4 टेबलस्पून हिंग
  5. 1/2 कपमोड आलेली मटकी
  6. 1/2 कपमोड आलेले मूग
  7. 1 टेबलस्पून तिखट
  8. 1 टेबलस्पून हळद
  9. चवीनुसारमीठ
  10. 1/2 कपबारीक चिरलेला पातीचा कांदा
  11. 1/2 कपबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम फ्राईंग पॅनमध्ये तेल घालून त्यात जिऱ्याची फोडणी द्यावी आणि त्यानंतर त्यात हींग टाकावे.

  2. 2

    आता त्यात मोड आलेली मटकी आणि मोड आलेले मूग घालून 2 ते 3 मिनिटे तेलात फ्राय करून घ्यावे.

  3. 3

    आता त्यात तिखट आणि हळद टाकावे.

  4. 4

    त्यानंतर त्यात शिजवलेला भात टाकून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    चवीनुसार मीठ, पातीचे कांदे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून राईस परत एकदा मिक्स करून घ्यावा.

  6. 6

    सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून गरमागरम स्प्राऊट फ्राईड राईस सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes