उत्तपा

Sonali raut
Sonali raut @cook_20483384

#प्रेमासाठी

उत्तपा

#प्रेमासाठी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १/२ कप मुगाची डाळ
  2. सव्वा ते दिड कप तांदूळ
  3. चवीपुरते मिठ
  4. कांदा
  5. टोमॅटो,कोथिंबीर
  6. १/२ वाटी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ आणि मुगाची डाळ पाण्यात साधारण ७-८ तास भिजत घालावे. नंतर मिक्सरमध्ये थोडे बारीक वाटून घ्यावे. मिश्रण एकदम पातळ किंवा घट्टं नसावे. मध्यमसरच वाटावे, त्यानुसार वाटताना पाणी घालावे. मिक्सरमध्ये डाळ व तांदूळ वाटताना १ चमचाभर मिठ घालावे.

  2. 2

    वाटलेले मिश्रण आंबवण्यासाठी उबदार ठिकाणी किमान १०-१२ तास झाकून ठेवावे. जर वातावरण खुप थंड असेल तर ओव्हन २-३ मिनीटे प्रिहीट करून बंद करावा व मिश्रण झाकून ओव्हनमध्ये ठेवावे. तेवढ्या उबेवर पिठ आंबते. आवश्यकतेनुसार आंबवलेल्या पिठात मिठ घालावे.

  3. 3

    पिठ आंबले कि कांदा पातळ आणि उभा चिरावा. कांद्याला थोडे मिठ चोळून घ्यावे. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

  4. 4

    नॉनस्टीक तवा गरम करावा. १/२ चमचा तेल घालावे. आंबवलेल्या पिठापैकी १ डाव पिठ तव्यावर घालून थोडे जाडसर पसरवावे. त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालावी

  5. 5

    मध्यम आचेवर तव्यावर झाकण ठेवून थोडी वाफ काढावी. एक बाजू शिजली कि सावकाशपणे कालथ्याने बाजू पलटावी कारण वरच्या बाजूवर आपण कांदा टोमॅटो घातले आहेत. दुसरी बाजू शिजू द्यावी. गरम गरम चटणीबरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali raut
Sonali raut @cook_20483384
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes