व्हेज उत्तपम / उत्तपा (veg uttapam recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर
#ब्रेकफास्ट
#व्हेज उत्तपम

व्हेज उत्तपम / उत्तपा (veg uttapam recipe in marathi)

#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर
#ब्रेकफास्ट
#व्हेज उत्तपम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. बॅटर करण्यासाठी साहित्य....
  2. 1 कपसाधा तांदूळ
  3. 1 कपइडली रवा
  4. 1 कपउडीद डाळ
  5. 1 टीस्पूनमेथी दाणे
  6. आवश्यकते नुसारपाणी
  7. उत्तपम करण्यासाठी साहित्य....
  8. 2कांदा
  9. 2टोमॅटो
  10. कोथिंबीर
  11. तेल / तूप वरून लावण्यासाठी
  12. 2 टीस्पूनलाल तिखट (हिरवी मिरची चे तुकडे)
  13. 2 टीस्पूनकाळा मसाला
  14. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    प्रथम उत्तपा बॅटर बनवण्यासाठी.....तांदूळ, इडली रवा,उडीद डाळ 2-3 वेळा स्वच्छ धून त्या मध्ये पाणी घालून 4-5 तास भिजत ठेवावी.भिजले कि ते मिक्सर मधून बारीक वाटून घेणे. व रात्रभर फेरमेंटेशन साठी ठेवून देणे. (सकाळी हे पीठ फुगून वर येते) दुसऱ्या दिवशी करताना फुगून आलेले बॅटर डावाने एकजीव करून घेणे.

  2. 2

    व या बॅटर मध्ये चवीनुसार मीठ आणि खूप बॅटर घट्ट असेल तर पाणी घालून एकत्र करणे. नंतर एका प्लेट मध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या अगदी बारीक चिरून घेणे. गॅस वर डोसा तवा गरम करण्यास ठेवणे.

  3. 3

    आता या तव्यावर डावाने बॅटर घेऊन ते घालावे व अलगद गोल फिरवून घेणे. खूप पातळ घालायचे नाही. थोडा जाडसर पसरून घेणे. आता त्या वर चिरून घेतलेल्या भाज्या थोडे थोडे सगळीकडे पसरून घेणे. आवडीनुसार मिरचीचे तुकडे किंवा लालतिखट, मसाला वरून घालावा.व बाजूने त्या वर तेल किंवा तूप चमच्याने सोडावे.आवडत असल्यास चीझ खिसुन घालू शकता.

  4. 4

    अलगद त्या भाज्या वरून थोडे दाबावेत. खाली पडत नाही.2 मिनिटे ठेवून उलटून घेणे. खालची बाजू सोनेरी झालेली असेल. उलटलेली बाजू 2-3 मिनिटे भाजून घेणे.

  5. 5

    अशा प्रकारे सगळे उत्तपे करून घेणे. गरम गरम चटणी, सांबर सोबत सर्व्ह करावे. खूप छान टेस्टी असे उत्तपम तयार मस्त जाळी पडते.

  6. 6

    मस्त टेस्टी उत्तपम तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes