#मांदेली करी

Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115

#सीफुड मांदेली ही मच्छी मला खायला खूप आवडते कारण ती चवदार असते शिवाय खाण्यासाठी सोपी आहे....आज मी मांदेली करी रेसिपी संपादित करत आहे...💯👍🏼

#मांदेली करी

#सीफुड मांदेली ही मच्छी मला खायला खूप आवडते कारण ती चवदार असते शिवाय खाण्यासाठी सोपी आहे....आज मी मांदेली करी रेसिपी संपादित करत आहे...💯👍🏼

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५०० ग्रॅम मांदेली मासे
  2. भाजलेला कांदा
  3. १/२ वाटी ओला खोवलेला नारळ
  4. वाटी हिरवीगार कोथिंबीर
  5. १ टीस्पून घरचा मसाला
  6. १/२ टीस्पून हळद
  7. १ टी स्पून मीठ
  8. ५-६ लसूण पाकळ्या
  9. १/२ इंचआले तुकडा
  10. कोकम (आमसूल)
  11. टोमॅटो
  12. गरजेनुसार पाणी
  13. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    मांदेली मासे स्वच्छ साफ करून वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.... आता वरील घटकामध्ये दाखविल्याप्रमाणे, एक कांदा गॅसवर मस्तपैकी भाजून घ्या....

  2. 2

    आता मिक्सर भांड्यात वाटणं करण्यासाठी ओला खोवलेला किंवा कापलेला नारळ, कोथिंबीर, आले, लसूण, घरचा वापरतला तुमचा आवडीचा नेहमीचा मसाला, हळद, मीठ, टोमॅटो हे सर्व वाटणं गरजेनुसार पाणी थोड थोड करून घालून मसाला वाटणं एकदम मऊसूत वाटून घ्या....कढई मध्ये तेल घेऊन त्यात हा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत फ्राय करा...💯👍🏼

  3. 3

    आता त्यात २-३ फ्रेश कोकम (आमसूल) घालून वरून गरजेनुसार पाणी घालून दणकून उकळी येऊ द्या..उकळी आल्यावर त्यात मांदेली घाला आणि आता पुन्हा एकदा उकळी आली की, गॅस बंद करून टाका.....सर्व्हिंग बाऊल मध्ये करी काढून ही करी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, किंवा पोळी सोबत सर्व करा....💯👍🏼

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes