विस्मरणात गेलेल्या रेसिपी - फणसाचे सांदण (fanasache sandan recipe in marathi)

Pallavii Paygude Deshmukh
Pallavii Paygude Deshmukh @cook_19803521

कोकणातील पारंपरिक पदार्थ फणसाचे सांदण

विस्मरणात गेलेल्या रेसिपी - फणसाचे सांदण (fanasache sandan recipe in marathi)

कोकणातील पारंपरिक पदार्थ फणसाचे सांदण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 -1/2 वाटीफणसाच्या गऱ्याचा रस
  2. 1 वाटीबारीक चिरलेला गुळ
  3. 1 वाटीइडली रवा
  4. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. 1 चिमूटहळद
  6. 1केळीच पान

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    पिकलेल्या फणसाचे गरे घेऊन,त्याचा मिक्सर मधून रस काढून घेणे. त्यात मधे 1 वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून मिक्स करणे

  2. 2

    एका कढईत 1tbsp तूप आणि एक चिमूट हळद टाकून इडली रवा भाजून घेणे,

  3. 3

    रवा भाजून झाल्यावर, थंड झाला की, फणसाच्या रसात इडली रवा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे, आणि 10 मिनिटे मुरायला ठेवणे

  4. 4

    इडली स्टँड मधे केळीच्या पानांचे छोटे तुकडे करून ठेवणे त्यावर तूप लावणे आणि मिक्स केलेलं मिश्रण त्यात टाकणे. आणि इडली स्टँड स्टीमर मधे ठेऊन 20 मिनिटे वाफवून घेणे, आणि तूप टाकून सर्व्ह करणे. नारळाच्या दूधा बरोबर पण सर्व्ह करतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavii Paygude Deshmukh
रोजी

Similar Recipes