केशरी भात

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

हिंदू नववर्षाची सुरुवात, चैत्र प्रतिपदा, गुढीपाडवा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. पण यावर्षी जगभर थैमान घालणाऱ्या एका विषाणूमुळे सण साजरा करताना मर्यादा आल्या. पण आई म्हणते, सण साजरे झाले नाही तर मुलांना कळणार कसं ? म्हणून गुढी उभारून नववर्षाची सुरुवात केली. सण म्हणजे गोड काहीतरी हवंच, मग साधा, सोप्पा, कमी वेळात होणारा केशरी भात केला.
#गुढी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-६जणांसाठी
  1. १ कप - बासमती तांदूळ
  2. १ कप - आंबेमोहोर तांदूळ
  3. ३ कप - साखर
  4. २ टेबलस्पून - साजूक तूप
  5. २ टेबलस्पून - बेदाणे/किसमिस
  6. २ टेबलस्पून - काजू-बदाम-पिस्ता यांचे काप
  7. अर्धा टीस्पून -वेलचीपूड
  8. पाव टीस्पून - खायचा केशरी रंग किंवा केशर
  9. फोडणीसाठी
  10. - ४-५ लवंगा,
  11. १" चे २ दालचिनीचे तुकडे,
  12. ४-५ हिरव्या वेलच्या

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दोन्ही तांदूळ धुवून त्यातील पाणी काढून टाकावे. काजू, बदाम, पिस्ता यांचे काप करून घ्यावेत. कढईत साजूक तूप तापवून त्यात लवंग, दालचिनी व वेलचीची फोडणी करावी. त्यात तांदूळ घालून मंद आचेवर चांगले परतून घ्यावे.

  2. 2

    एका बाजूला एका पातेल्यात तांदळाच्या दुप्पट म्हणजे ४कप पाणी गरम करत ठेवावे. त्यात खायचा रंग किंवा केशर घालावे. तांदूळ परतून झाले, म्हणजे प्रत्येक दाणा मोकळा झाला की त्यात रंगाचे गरम पाणी ओतावे. एकसारखे करून भात शिजवून घ्यावा. भात परतताना काळजी घ्यावी म्हणजे तांदूळ मोडणार नाही. भात शिजल्यावर त्यात साखर घालून एकत्र करावे. साखर विरघळून एकसार झाली व भात चांगला शिजला की त्यात वेलचीपूड व सुका मेवा घालून एकत्र करावे.

  3. 3

    साखर विरघळल्यावर सुकेपर्यंत चांगली वाफ काढावी. आपला केशरी भात तयार आहे, गरम- गार कसाही खा. मी शक्यतो रंगांचा वापर कमी करते, आपल्याला आवडत असल्यास जास्त रंग वापरू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes