सोयाबीन भाजी

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792

सोयाबीन भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपवाफवलेले सोयाबीन
  2. 1मोठा कांदा
  3. 2टोमॅटो
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. अर्धा कप कोथिंबीर
  6. 8लसूण पाकळ्या
  7. 1 टीस्पूनबडीशेप
  8. 1 टीस्पूनतीळ
  9. 4लवंग
  10. 1 टेबलस्पूनमालवणी मसाला
  11. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  12. अर्धा टी स्पून हळद
  13. 1 टीस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सोयाबीन वाफवून घ्या. पुढच्या वेळेस मी हे मीठ आणि लाल तिखट मध्ये फ्राय करून घेणार आहे जेणेकरून चांगली चव येईल. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा, त्यात बडीशेप कांदा आणि लसुन चांगले परतून घ्या. त्यानंतर टोमॅटोचे काप ऍड करून त्याला मऊ होईपर्यंत परतून घ्या. याचबरोबर थोडा हळद आणि लाल तिखट पण ॲड करा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून ब्लेंड करून घ्या. ब्लेंड करताना हिरवी मिरची आणि कच्ची कोथिंबीर पण ॲड करा.

  2. 2

    पुन्हा पॅन गरम करत ठेवावा त्यात थोडे तेल घाला. हे मिश्रण थोडे परतून घ्या मिरची आणि कोथिंबीर चा कच्च पणा जायला हवा. त्याचबरोबर मालवणी मसाला आणि गरम मसाला ॲड करा. थोडी उकळी आल्यानंतर सोयाबीन ॲड करा आणि चांगले मिक्स करून घ्या. पुन्हा पाच ते सात मिनिटं उकळी आल्यानंतर सोयाबीन भाजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
रोजी
When people meet each other for the love of food, the journey lasts forever. Welcome to our Community of a tasteful living!
पुढे वाचा

Similar Recipes