रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रामबेसन
  2. 100 ग्रामतूप
  3. 100 ग्रामसाखर
  4. 75 ग्रामतेल
  5. 1/4 चमचाखाण्याचा सोडा
  6. 1/2 कपपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बेसन चाळून घ्यावे. व त्यात सोडा टाकून पुन्हा चाळून घ्यावे.तूप व तेल एकत्र करावे.कढईत साखर घालून त्यात अर्धा कप पाणी टाकावे.

  2. 2

    एका गॅसवर साखरेचा पाक करण्यास ठेवावे व दुसऱ्या गॅसवर एकत्र केलेले तूप व तेल गरम करण्यास ठेवावे.साखरेचा एकतारी पाक करून घ्यावा. पाक झाल्यावर गॅस बंद करून त्यात हळूहळू बेसन टाकून एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    पाक आणि बेसन एकजीव झाल्यावर पुन्हा गॅसवर कढई ठेऊन गॅस चालू करावा व थोडा वेळ बेसन पाकात शिजवून घ्यावे पाच मिनिटांनी त्यात गरम केलेलं तूप एक चमचा टाकून पटापट हलवत रहावे पुन्हा गरम तूप घालून हलवावे ही कृती जो पर्यंत बेसन तूप सोडत नाही तोपर्यंत करावी बेसन तुपात बाजून झाल्यावर तुपाचा हात लावलेल्या ट्रे मध्ये ओतावे व सेट होण्यासाठी तसेच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे गार झाल्यावर ट्रे मधून काढून त्याच्या वड्या पाडाव्या अशाप्रकारे मैसूरपाक तयार झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vinaya Sanas
Vinaya Sanas @cook_21118890
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes